🚨 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केली अटक; २१ गुन्ह्यात १ कोटी ९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 21, 2020

🚨 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केली अटक; २१ गुन्ह्यात १ कोटी ९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

🚨 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी केली अटक; २१ गुन्ह्यात १ कोटी ९ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

पुणे शहर, पिंपरी चिंचवडी व पुणे ग्रामीण परिसरात घरफोडी चोरी, वाहन चोरी, सराफ दुकानात चोरी, बंद फ्लॅट फोडून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सराईत टोळीमधील दोघांना वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तसेच चोरीचे सोने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी अटक केली आहे. वानवडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून २१ गुन्ह्यात ११० किलो चांदी, २० तोळे सोन्याचे दागिने, ६ मोटारी, २ दुचाकी मिळून असा एकुण १ कोटी ९ हजार ५३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या सराईतांची नावे :-
तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा. रामटेकडी,हडपसर),
जयसिंग उर्फ पिल्लूसिंग कालुसिंग जुनी (वय २६, रा. वैदवाडी,हडपसर).
चोरीचा माल स्विकारणारा :-
बंडू वसंत वाघमारे (वय ३५, रा. हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपींचे फरार साथीदार :-
विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी,
सनीसिंग पापासिंग दुधाणी यांचा पोलीस शोध घेत आहेत.

वानवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,
वानवडी पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस स्टेशन हद्दीतील मधील एकुण ३४ सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन त्यांची वर्गवारी केली असता विशेष करुण असे आढळून आले की, वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील कनक ज्वेलर्स, अंबीका ज्वेलर्स, चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीतील बालाजी ज्वेलर्स व सिंहगड रोड येथील ओम ज्वेलर्स यातील सीसीटीव्ही फुटेजची परीपुर्ण पहाणी केली असता सदर आरोपी हे त्यांचे चालण्या, वागण्याच्या हावभावावरुण रामटेकडी व हडपसर भागातील आरोपी असल्याचे संशय आल्याचे वानवडी पोलीस स्टेशनचे पो.शि.श्री.नासिर देशमुख व पो.शि.श्री.नवनाथ खताळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर उपयुक्त माहिती मिळाताच हि माहिती वानवडी पोलीस स्टेशनचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.क्रांतीकुमार पाटील यांना कळवत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे पो.ह.श्री.राजु रासगे, पो.ना.श्री.योगेश गायकवाड, पो.शि.श्री.सुधीर सोनवणे, पो.शि.श्री.महेश कांबळे, पो.शि.श्री.अनुप सांगळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून घरफोडी करणारे आरोपी तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय २८, रा.आनंदनगर रामटेकडी,हडपसर,पुणे), जयसिंग उर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २६, रा.वैदवाडी हडपसर,पुणे) यांना ताब्यात घेत अटक करत त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवडी व पुणे ग्रामीण परिसरात घरफोडी चोरी, वाहन चोरी, सराफ दुकान चोरी ही त्यांचे साथीदार विकीसिंग जालींदरसिंग कल्याणी (रा.रामटेकडी,हडपसरपुणे), सनीसिंग पापासिंग दुधाणी (वय १९,रा.बिराजदार नगर, हडपसर,पुणे) यांच्यासोबत केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीप्रमाणे चोरीचा माल स्विकारणारा बंडु वसंत वाघमारे (वय ३५, रा.गोसावी वस्ती, हडपसर,पुणे) याला शिताफीने अटक केली तसेच आरोपीचे साथीदार फरार झाले असून विशेष तपास पथकाचे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वानवडी पोलीस स्टेशनचे विशेष तपास पथकाच्या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडुन पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण परिसरातील घरफोडी चोरी, वाहन चोरी, सराफ दुकान चोरी असे मिळुन एकुण २१ गुन्हे (वानवडी-३, हडपसर-२, कोंढवा-५, मुंढवा-१, येरवडा-२, सिंहगड-१, वाकड-२, हिंजवडी-१, चिंचवड-१, चिखली-१, लोणी काळभोर-१, सासवड-१) उघड करुन त्यामध्ये एकुण १०९.२७० किलो चांदी, २० तोळे सोने, चोरी करण्यासाठी वापरलेली सहा चारचाकी वाहने (१ शेवरेलो एन्जॉय, १ मारुती व्हॅगनर, १ टाटा इंडीका, १ शेवरेलो बीट्स, २ सॅन्ट्रो) तसेच दोन दुचाकी (१ बजाज पल्सर २२० सीसी आणि १ हिरो होंडा सीडी १०० एस.एस.) व रोख रक्कम रुपये २७,०००/-, तसेच गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेले एक स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, ३ कात्री, ५ बनावट चाव्या असा एकुण १ कोटी ९ हजार ५३०/- रुपये (एक कोटी नऊ हजार पाचशे तीस रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी उघड केलेल्या गुन्हयांची यादी :-
१) वानवडी पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम २३३/२०१८ - भादविक - ४५४,४५७.३८० - मुद्देमाल - सोने
२) वानवडी पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ४०/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - रोख रक्क्म
३) वानवडी पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ५१/२०२० - भादविक - ४५७,३८० - मुद्देमाल - सोने, रोख रक्कम
४) हडपसर पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम २३७/२०२० - भादविक - ३७९ - मुद्देमाल - शोवरेलो बीट (चारचाकी)
५) हडपसर पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ११७०/२०१९ - भादविक - ३७९ - मुद्देमाल - हिरोहोंडा सीडी १००(दुचाकी
६) कोंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १३१/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - सोने, चांदी
७) कोंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १३३/२०२० - भादविक - ४५७,३८० - मुद्देमाल - सोने,चांदी,रोख रक्कम
८) कोंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ४७/२०२० - भादविक - ३८० - मुद्देमाल - सोने,चांदी
९) कोंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ९४/२०२० - भादविक - ४५७,३८० - मुद्देमाल - सोने,रोख रक्कम
१०) कोंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ८८/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - सोने
११) मुंढवा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ६४/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - सोने,चांदी
१२) येरवडा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १५९/२०२० - भादविक - ३७९ - मुद्देमाल - हुंडाई सेन्ट्रो (चारचाकी)
१३) येरवडा पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ७८५/२०१९ - भादविक ३७९ - मुद्देमाल - बजाज पल्सर २२० (दुचाकी)
१४) सिंहगड पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम २९/२०२० - भादविक - ४५७,३८० - मुद्देमाल - सोन,चांदी
१५) लोणी काळभोर पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १०७/२०२० - भादविक - ३७९ - मुद्देमाल - हुंदाई सॅन्ट्रो (चारचाकी)
१६) चिखली पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ५७/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८०,३७९ - मुद्देमाल - सोने, मारुती वॅगनार (चारचाकी)
१७) वाकड पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ४५/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - चांदी
१८) वाकड पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम ४६/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - चांदी
१९) चिंचवड पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम २०/२०२० - भादविक - ४५४,४५७,३८० - मुद्देमाल - सोने,चांदी
२०) हिंजवडी पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १०७९/२०१९ - भादविक - ३७९ - मुद्देमाल - टाटा इंडीका (चारचाकी)
२१) सासवड पोलीस स्टेशन - गु.र.नं व कलम १२/२०२० - भादविक - ३७९ - मुद्देमाल - शेवरेलो एन्जॉय (चारचाकी)

सदरची कारवाई,
श्री.रविंद्र शिसवे सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री.सुनिल फुलारी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर, श्री.सुहास बावचे पोलीस उप-आयुक्त परिमडळ ५ पुणे शहर, श्री.सुनिल कलगुटकर सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर यांचे सुचनेनुसार श्री.क्रांतीकुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर, श्री.सलीम चाऊस पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.जोगदंड, स.पो.फौ.श्री.रमेश भोसले, पो.हवा.श्री.राजु रासगे, पो.ना.श्री.योगेश गायकवाड, पो.ना.श्री.संभाजी देविकर, पो.शि.श्री.नासीर देशमुख, पो.शि.श्री.नवनाथ खताळ, पो.शि.श्री.सुधीर सोनवणे, पो.शि.श्री.अनुप सांगळे, पो.शि.श्री.महेश कांबळे, पो.शि.श्री.सागर नवले, पो.शि.श्री.विशाल परकाळे, पो.शि.श्री.नितेश पुंडे, पो.शि.श्री.सुर्दशन म्हांगरे, पो.शि.श्री.अजिंक्य नानगुडे यांच्या विशेष तपास पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages