बिबवेवाडीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 22, 2020

बिबवेवाडीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले..

बिबवेवाडीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले..

पुणे शहर बिबवेवाडी परिसरात रस्त्याने पायी फिरणाऱ्या 71 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे (60 हजार रुपये कीमती) सोन्याचे मंगळसूत्र एका अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना शुक्रवार दि. 21 रोजी सायंकाळी 05:45 वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी 71 वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेला प्राप्त माहितीनुसार,
बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स हे उंच टेकडावर आहे. या लॉन्समध्ये धार्मिक कार्य व लग्न समारंभाचे कार्यक्रम होत असतात. लॉन्समध्ये ज्यावेळी कार्यक्रम असतात तेव्हा याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते, मात्र ज्यावेळी लॉजमध्ये कार्यक्रम नसतात तेव्हा याठिकाणी लॉन्सच्या कामगारांच्या व्यतिरिक्त कोणीही नसतात. फक्त रोज सायंकाळी 04:30 ते 07:30 वाजता येथील परिसरातील नागरिक पाय मोकळे करायला व फेरफटका मारण्यासाठी येत असतात. असेच, शुक्रवार दि. 21 रोजी सायंकाळी 05:45 वाजण्याच्या सुमारास सौ.कल्पना दत्तात्रय मुळे (वय 71, रा.बिबवेवाडी,पुणे) या रस्त्याने पायी फिरत असतांना त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे (60 हजार रुपये कीमती) सोन्याचे मंगळसूत्र एका अज्ञात अंगात पिवळा रंगाचा व वरील बाजूस तांबड्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावले. सौ.कल्पना मुळे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. या घटनेप्रकरणी 71 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.न.85/2020 भादवि कलम 392 अन्वय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानावडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेऊन तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Post Bottom Ad

#

Pages