साप्ताहिक राशीभविष्य :- २३ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, February 23, 2020

साप्ताहिक राशीभविष्य :- २३ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२०

साप्ताहिक राशीभविष्य :- २३ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२०
मेष : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात जम बसवा. मागिल येणे वसूल करा. नवीन ओळखीतून चांगले काम मिळवता येईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. चांगला बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. योजना गतिमान होतील. लवकर निर्णय घ्या. कामास सुरुवात करा. घरातील वातावरण आनंदी राहील. शुभ कार्य ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील. कोर्ट केस संपवा. शोध मोहीम यशस्वी होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात उच्च यश मिळेल. शुभ दि. २४,२५
वृषभ : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. महत्त्वाची कामे धंद्यातील सप्ताहाच्या सुरुवातीला करून घ्या. वसुली करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत टिकून राहता येईल. कठोर बोलणे टाळा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या मदतीने निर्णय घ्या. सप्ताहाच्या शेवटी संसारात तणाव होऊ शकतो. मैत्रीत गैरसमज होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शोध मोहीम यशस्वी करता येईल. व्यसनात वेळ घालवू नका. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीबरोबर व्यवहार करू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात मेहनत घ्यावी. शुभ दि.२४,२५
मिथुन : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळवता येईल. मागिल येणे वसूल करा. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. नोकरी मिळेल. बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. योजना मार्गी लावता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरेल. जुना वाद मिटवा. व्यवहार पूर्ण करा. कोर्ट केस संपवा. शिक्षणात मोेठे यश मिळेल. शोध मोहीम यशस्वी होईल. शुभ दि. २४,२६
कर्क : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, चंद्र शुक्र युती होत आहे. धंद्यात अडचणीतून मार्ग शोधावयाचा आहे. दादागिरी चालणार नाही. कामगार वर्गाचा विचार ऐकून घ्या. विरोध करण्याने काम बिघडेल. नम्रता ठेवा. गोड बोला. रागावर ताबा ठेवा. नोकरीत गुप्त कारवायांचा त्रास होईल. कायद्याचे पालन करून निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात कोणतेही आक्रमक विधान करणे योग्य ठरणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात यश हुकण्याची शक्यता आहे. कोर्ट केस कठीण आहे. शोध मोहिमेत दिशाभूल होईल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खोटे बोलू नये. यश प्रयत्नानेच मिळेल. शुभ दि. २६,२९
सिंह : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात वेळेला महत्त्व द्या. नवे काम मिळवा. जमिनीसंबंधी काम लवकर करून घ्या. नोकरीत प्रभाव राहील. सप्ताहाच्या मध्यावर धावपळ होईल. घरात किरकोळ वाद होईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक होेईल. मोठा निर्णय घेता येईल. घर, वाहन, घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळख होईल. शोध मोहीम गाजेल. विद्यार्थी वर्गाने घेतलेली मेहनत यश देईल. जास्त प्रयत्न करा. मोठे यश मिळवा. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २७,२९
कन्या : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, चंद्र शनि लाभयोग होत आहे. या सप्ताहात तुम्हाला सर्व ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावयाचा आहे. धंद्यात वाद वाढवू नका. हातात असलेले काम पूर्ण करा. नोकरवर्गाला प्रेमाने वागवा. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होऊ शकते. सावध रहा. भडक डोक्याने निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात काही लोक तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जी माहिती देतील ती नीट तपासून पहा. मगच बोला. कठोर भाषेत कुणावरही टीका करू नका. बाजू तुमच्यावर उलटू शकते. कायदा पाळा. अभ्यासात मुलांनी आळस करू नये. स्पर्धा कठीण आहे. दुखापत टाळा. शुभ दि. २६,२७
तूळ : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य मंगळ लाभयोग होत आहे. धंद्यात मेहनत घ्या. लाभ वाढेल. धाडसी निर्णय घेता येईल. वसुली सप्ताहाच्या शेवटी होऊ शकेल. नोकरी मिळेल. फायदेशीर बदल करता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमची योजना मार्गी लावा. काम पूर्ण करा. चांगल्या ग्रहांची अविवाहितांना स्थळे मिळतील. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. घर, जमीन घेण्याचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केस संपवा. नवीन ओळख होईल. शिक्षणात प्रगती होईल. धरसोडवृत्ती ठेऊ नका. शोध मोहीम यशस्वी कराल. परदेशात जाण्याचा योग येईल. शुभ दि. २४,२९
वृश्चिक : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात सौम्य धोरण ठेवा. अडचणी येतील. खर्च वाढेल. नवे काम सप्ताहाच्या सुरुवातीला मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीत गुप्त कारवाया होतील. प्रभाव राहील. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधक तुम्हाला पेचात पकडतील. दादागिरी केल्यास तुमचे डाव उघड होतील. संसारात तणाव, विरोध होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वस्तू सांभाळा. कला-क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. नवीनच ओळख झालेल्या व्यक्तीवर जास्त भरवसा ठेऊ नका. शोध मोहिमेत अडथळा येईल. अभ्यासात लक्ष द्या. आळस करू नका. शुभ दि. २५,२६
धनु : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात सुधारणा करा. नवे काम मिळवा. वसुली करा. ओळखी वाढतील. नोकरी मिळेल. तुम्हाला अधिकार मिळेल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला पुढे जाता येईल. नव्या योजना करा. जनसंपर्क वाढवा. नावलौकिक मिळेल. घरातील कामे होतील. प्रेमाला चालना मिळेल. अविवाहितांना स्थळे येतील. जीवनाला चांगली कलाटणी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्ट केस कठीण वाटेल; पण यश मिळवाल. शिक्षणात आळस नको. प्रगतीची संधी सोडू नका. शुभ दि. २३,२९
मकर : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. साडेसाती सुरू आहे. या सप्ताहात धंद्यात वाढ होईल. प्रयत्न करा. समस्या सोडवा. ओळखीतून काम मिळेल. नोकरी मिळेल. हातात असलेले काम लवकर पूर्ण करा. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवा. ध्येय समोर ठेवा. भलत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही तुमचे विचार बदलू नका. जुना अनुभव तुम्ही आठवा. प्रगतीसाठी संघर्ष करावा लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कोर्ट केस जिंकाल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. अभ्यास करावा. प्रयत्नानेच यश खेचावे लागेल. शुभ दि. २३,२६
कुंभ : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, सूर्य बुध युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. जम बसेल. मोठे कंत्राट मिळेल. पैशांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करून ठेवा. पुढे उपयोग होईल. वसुली करा. नोकरीत चांगला बदल करता येईल. अधिकार मिळेल. परदेशात जाल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. कायद्याच्या कक्षेत राहून निर्णय घ्या. तुम्ही तडफदार काम करू शकाल. मागे राहू नका. लोकप्रियता मिळवा. लोकांच्यामध्ये मिसळा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ओळखी वाढतील. शोध मोहीम फत्ते कराल. शिक्षणात उच्च प्रतीचे यश मिळवा. अविवाहितांना स्थळे मिळतील. शुभ दि. २६,२९
मीन : या सप्ताहात मेष राशीत शुक्र प्रवेश, चंद्र शुक्र लाभयोग होत आहे. धंद्यात अडथळे येतील. नम्रपणे बोला, वागा. कठोर शब्दात चर्चा करू नका. कायद्याने वागा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीने राहा. उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा मुद्दा निष्भ्रम ठरेल. नम्रता ठेवा. संयम ठेवा. आग्रह करा; पण दादागिरी कुठेही करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण आहे. संसारात वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होऊ शकते. कोर्टमध्ये योग्य सल्ला घ्या. शिक्षणात शिक्षकांना कमी समजू नका. तुमच्या कामाचे कौतुक होईल. शुभ दि. २६,२८

Post Bottom Ad

#

Pages