😱 पुण्यात बँकेतून रोकड काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेकडील २५ हजारांची रोकड रिक्षाचालकाने लुटली.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 5, 2020

😱 पुण्यात बँकेतून रोकड काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेकडील २५ हजारांची रोकड रिक्षाचालकाने लुटली..


😱 पुण्यात बँकेतून रोकड काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेकडील २५ हजारांची रोकड रिक्षाचालकाने लुटली..

पुणे शहरात बँकेतून रोकड काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेकडील २५ हजारांची रोकड रिक्षाचालकाने लुटल्याची घटना कोथरूड भागात घडली. निर्मनुष्य गल्लीत रिक्षा नेल्यानंतर ज्येष्ठ महिलेला संशय आला आणि त्यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षा भाडय़ाची रक्कम देत असताना महिलेच्या पाकिटातील रोकड हिसकावून चोरटा पसार झाला. ज्येष्ठ महिलेला ढकलून दिल्यानंतर रिक्षाचे चाक हात आणि पायावरून गेल्याने त्या जखमी झाल्या झाल्याने त्यांना रस्त्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
जखमी झालेल्या ६५ वर्षीय तक्रारदार महिला सेवानिवृत्त आहेत. त्यांचे निवृत्तिवेतन खाते पौड रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंदनगर शाखेत आहे. निवृत्तिवेतनाची २५ हजारांची रक्कम काढून त्या दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्या बँकेतून घरी जात होत्या. रस्ता ओलांडल्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाला थांबविले. रिक्षाचालकाने पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलच्याजवळ असलेल्या एका छोटय़ा गल्लीत रिक्षा नेली. त्यांना पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनीत असलेल्या वृंदावन सोसायटीत जायचे होते. गल्ली निर्मनुष्य असल्याने संशय येऊन त्यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले. पाकिटातून रिक्षा भाडे देण्यासाठी वीस रुपयांची नोट काढली. निवृत्तिवेतन खाते पुस्तिकेत त्यांनी पंचवीस हजारांची रोकड ठेवली होती. रिक्षाचालकाने रोकड पाहिली आणि काही कळायच्या आत रोकड हिसकावून घेतली. ज्येष्ठ महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर रिक्षाचालक त्यांना ढकलून देऊन पसार झाला. रिक्षाचे मागचे चाक त्यांच्या हात आणि पायावरून गेले आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या व परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवत त्याआधारे पसार झालेल्या रिक्षाचालकाचा माग काढत शोध घेण्यात येत आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.एन.ए.मुंढे करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages