😱 महात्मा गांधीनी ब्रिटीशांच्या संगनमताने रचला स्वातंत्र लढा; खासदार अनंतकुमार हेगडे यांचे विधान.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 3, 2020

😱 महात्मा गांधीनी ब्रिटीशांच्या संगनमताने रचला स्वातंत्र लढा; खासदार अनंतकुमार हेगडे यांचे विधान..


😱 महात्मा गांधीनी ब्रिटीशांच्या संगनमताने रचला स्वातंत्र लढा; खासदार अनंतकुमार हेगडे यांचे विधान..
महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण आणि सत्याग्रह करून भारताला स्वातंत्र मिळून दिले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहामुळे देश सोडला नव्हता, तर निराशेतूदेश सोडला होता. महात्मा गांधींनी नी काही अंदोलने आणि उपोषण केली आहेत. हे सर्व नाटकच होते, असे विधान अनंतकुमार हेगडे म्हणाले आहेत. यावरून नवा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. नुकतीच बंगळरू येथील एका कार्यक्रमात अनंतकव्युमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, महात्मा गांधीचा स्वातंत्र लढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथागतीत नेत्यांनी एकादाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे अनंतकुमार हेगडे म्हणाले होते. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधींनी जी काही आंदोलने, उपोषणे करायची ही नाटकच होती. असेही अनंतकुमार म्हणाले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला होता. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली होती. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. सध्या हा वाद शमला आहे. मात्र, अनंतकुमार यांनी केलेल्या विधानमुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages