😱 पुण्यात खेळाच्या नादात दोन वर्षाचा चिमुरडा पडला नाल्यात; बचाव कार्य सुरू.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 13, 2020

😱 पुण्यात खेळाच्या नादात दोन वर्षाचा चिमुरडा पडला नाल्यात; बचाव कार्य सुरू..


😱 पुण्यात खेळाच्या नादात दोन वर्षाचा चिमुरडा पडला नाल्यात; बचाव कार्य सुरू..

पुण्याच्या सिंहगड रोडवरील रक्षालेखा सोसायटीच्या परिसरात बुधवारी सायंकाळी खेळाच्या नादात दोन वर्षाचा चिमुरडा थेट नाल्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षाचा मुलगा संस्कार बंडू साबळे अचानक खेळता खेळता नाल्यात पडला आणि साबळे कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला. मोठ्या प्रमाणात शोध करून देखील मुलगा न मिळाल्याने साबळे कुटुंबीय चिंतेत आहे.

मुलगा थेट नाल्यात पडल्याच्या घटनेची माहिती मिळताच, सायंकाळी एरंडवणा अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य सुरु केलं मात्र, बचाव पथकाला दोन वर्षाचा मुलगा संस्कार साबळे मिळून आला नाही. रात्र झाल्याने व साहित्याचा अभावामुळे बचाव कार्य करण्यात अडथळा निर्माण होत असल्याने बचाव कार्य थांबविण्यात आलं होतं ते आज सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. संस्कार पडलेल्या नाल्यात 10 फुट खोल असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने मुलाचा शोध न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. साबळे कुटुंबीय मराठवाड्यातून काही दिवसांपूर्वीच पुण्यात येऊन स्थायिक झाले आहेत.

अग्निशामक दलाचे अधिकारी रणपिसे यांनी सांगितले की...
दोन वर्षाचा मुलगा पडलेल्या नाल्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की, पुढील छाननी करण्यामध्ये देखील यंत्रणेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. नाल्यामध्ये अनेक झाडे झुडपे आणि राडा रोड असल्यामुळे अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages