आत्ता मिठाईवर सुद्धा असणार एक्सपायरी डेट.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 26, 2020

आत्ता मिठाईवर सुद्धा असणार एक्सपायरी डेट..

आत्ता मिठाईवर सुद्धा असणार एक्सपायरी डेट..

मिठाईच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असणारी खुली मिठाई पेढे, बर्फी, गुलाबजाम, रसगुल्ला पासून ते असे सर्वच खुल्यावर विकण्यात येणारे गोड पदार्थ हे कधी तयार केले आणि कधी पर्यंत वापरता येणार हे सांगितल्याशिवाय आता विक्रेत्यांना मिठाई विकता येणार नाही आहे. या पदार्थांची तारीख ग्राहकांना दिसेल अशा स्वरूपात ती प्रदर्शित करणे आता बंधनकारक असल्याचे अन्नसुरक्षा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. यासाठीचा आदेश अन्न सुरक्षा आणि मानके कायदा (एफएसएसएआय) १ जून २०२० पासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे.

काय आहे आदेशात..
आपण अनेकदा पॅक बंद पदार्थांऐवजी सुटी मिठाई खाणे पसंत करतो मात्र, यामुळे आपल्या तब्बेतीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. काही वेळेस या पदार्थांमध्ये भेसळ करून मिठाई विक्रेता ग्राहकांना फसवत असतो मात्र आता यापुढे अशा मिठाई विक्रेत्यांना चांगलाच दणका बसणार आहे. कारण अन्नसुरक्षा प्राधिकरण विभाग आता अशा विक्रेत्यांवर आळा बसवणारा एक नियम जारी करणार आहे. सोमवारी यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. यानूसार विक्रेत्यांना सुटी मिठाई विकताना ती कधी तयार केली आणि किती तारखेपर्यंत ग्राहक ती मिठाई वापरू शकतो या स्वरूपाची पाटी मिठाईच्या ट्रेवर लावणे आता बंधनकारक असणार आहे.

अन्नसुरक्षा प्राधिकरण विभाग (एफएसएसआय) ने जनहित लक्षात घेत देशातील सर्व उघड्यावर मिठाई विकणाऱ्या विक्रेत्यांना ते पदार्थ कधी तयार केली आणि कधीपर्यंत वापरता येणार हे नमुद करणे आता बंधनकारक असणार आहे. यापदार्थाची मुदत ग्राहकांना स्पष्टपणे दिसेल अशा स्वरूपात ते प्रदर्शित कराव्या हे आदेशात अन्नसुरक्षा विभागाने नमुद केले आहे.

या उत्पादकांची नाराजी..
हा निर्णय घोषित केल्यानंतर फेडरेशन ऑफ स्वीट्स अॅण्ड नमकिन मॅन्युफॅक्चर्स या मध्यवर्ती संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. या संघटनेत हल्दिराम, बिकानेरवाला यांसारखे तब्बल ४०० हून अधिक दुकानदार सदस्य आहेत. ‘एका दुकानात अनेक वेगवेगळे पदार्थ विक्रिसाठी मांडले जातात दुकानांमध्ये साधारण या प्रत्येकाची वापरण्यासाठीचा काळ हा वेगवेगळा असतो. म्हणून प्रत्येक उत्पादनाच्या ट्रेवर ते कधी केले आणि ते कधी पर्यंत वापरता येणार हे लिहीने किंवा नमुद करणे शक्य नसल्याचे’ सांगत या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

अनेक पॅकबंद तसेच ब्रॅण्डेड पदार्थांवर उत्पादनाची तारीख आणि ते कधा पर्यंत वापरता येणार हे नमुद केलेले असते रसगुल्ला, गुलाबजाम सारखे पदार्थ देखील आता पॅकबंद स्वरूपात उपलब्ध असल्याने हे पदार्थ कधी पर्यंत तयार करता येऊ शकतात हे ठाऊक असते त्यामुळे अशा कंपन्यांना फसायच्या आदेशाचा फटका बसणार नाही. मात्र देशभरात हजारो मिठाई दुकाने आहेत जिथे मिठाई फार पुर्वीपासून परंपरागत पद्धतीने तयार केली जाते अशा वेळेस यांवर तारीख नमुद केली जात नाही. अशा प्रकारे मिठाई गोड पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तूप, साखर,खवा यांसारख्या पदार्थाचा वापर केला जातो. मात्र अशा वेळेस या घटकांतून पदार्थात भेसळ होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे याला आळा बसावा यासाठी फसायने हा आदेश जारी केला आहे.

Post Bottom Ad

#

Pages