👌मार्केटयार्डात प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 13, 2020

👌मार्केटयार्डात प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई..

✍🏻 भूषण गरुड
👌मार्केटयार्डात प्लास्टिक पिशव्या वापरांवर कारवाई..
बिबवेवाडी परिसरात विविध व्यावसायिकांची तपासणी करीत असताना पाच व्यावसायिकांकडून प्लास्टिक पिशव्या व फॉइल पेपरचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या प्लास्टिक वापरावर बंदी असतांनाही व्यवसायिक उपयोगासाठी प्लास्टिक पिशव्यां व फॉइल पेपरच्या वापर करणाऱ्या व्यवसायिक यांचे प्रबोधना बरोबर दंडात्मक कारवाईची मोहीम पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजी कार्यालयाच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत 300 किलो प्लास्टिक व 50 किलो फॉइल पेपर जप्त करून पाच व्यावसायिकांना 35 हजार दंड करण्यात आला आहे.
गुरुवार दि.13 फेब्रुवारी 2020 सकाळी 10:00 ते 1:00 यावेळेत बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे मा.महापालिका सहाय्यक आयुक्त श्री.अविनाश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली मा.वरीष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.विक्रम काथवटे, श्री.चंद्रकांत लाड व आरोग्य निरीक्षक श्री.विनोद साबळे, श्री.सुजय ठकार, श्री.महेश जाधव, श्री.शब्बीर शेख, श्री.रोहिदास डिबंळे व पाच आरोग्य कर्मचारी सहभागी होते.
मार्केटयार्ड येथील धान्य बाजार गेट नंबर 5 मधील लेनमध्ये विविध व्यवसायिकांची तपासणी करीत असतांना पाच व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या व फॉइल पेपरचा वापर होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याकडून सुमारे 300 किलो प्लास्टिक पिशव्या व 50 किलो फॉइल पेपर जप्त करण्याबरोबर 35 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आव्हानही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

#

Pages