कोंढव्यात अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 18, 2020

कोंढव्यात अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल..

😱 कोंढव्यात अल्पवयीन मुलीस नेले पळवून; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल..

पुणे शहर कोढवा येथील १७ वर्षीय २ महीने अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याची घटना शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी २०२० रोजी पहाटे ०६:०० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी कोंढवा पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात अपहरण कायद्याद्वारे सोमवार दि.१७ रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार,
पुणे शहर येवलेवाडी,कोंढवा खुर्द येथील एका कुटुंबात राहणाऱ्या शाळकरी मुलीला अज्ञात इसमाने कसेतरी आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची घटना घडली आहे तिच्या पालकांनी सगळीकडे शोध घेऊनही ती न सापडल्याने या प्रकरणी तिच्या पित्याने कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम 363 अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर करत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages