कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षकाना धक्काबुक्की; तीन आरोपीची येरवडा जेलमध्ये रवानगी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 24, 2020

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षकाना धक्काबुक्की; तीन आरोपीची येरवडा जेलमध्ये रवानगी..


कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस निरीक्षकाना धक्काबुक्की; तीन आरोपीची येरवडा जेलमध्ये रवानगी..

पुणे शहरात दिवसेनदिवस पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढतच आहेत असाच एक धक्कादायक प्रकार महाशिवरात्रीच्या रोजी ड्रंक अंड ड्राईव्हच्या अंतर्गत कोंढवा वाहतूक पोलीस निरीक्षक कर्तव्य करत असताना मोटार सायकलवर ट्रिपल सिट येत वाहतुकीचे कोणतेही नियम नपाळणाऱ्याला थांबवुन लायसन्सची विचारणा केली असता तीन आरोपींनी कोंढवा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना सोमजी चौक,कोंढवा बुद्रुक,पुणे येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस नाईक अमित सस्ते यांनी फिर्यादिनुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

कोंढवा वाहतूक पोलीस निरीक्षकांना धक्का-बुक्की करणारे आरोपी..
१) रजनिकांत नागोराव कांबळे (वय २३, रा.मु.पो.साबळेवाडी,ता.खेड,जि.पुणे),
२) प्रसाद दत्तात्रय रामापुरे (वय २२),
३) सुर्यकांत आनंता फुगारे (वय २२, रा. लक्ष्मी नगर,कोंढवा,पुणे) यांना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावत येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरात कोंढवा परीसरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोमजी चौक,कोंढवा बुद्रुक,पुणे येथे ड्रंक अंड ड्राईव्हच्या अंतर्गत कोंढवा वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत निंबाळकर यांनी कायदा-सुव्यवस्था राहण्याकामी स्वतः सहकारी कर्मचाऱ्यान समवेत कारवाईचे कर्तव्य बजावित असताना मोटार सायकलवरुन ट्रिपल सिट येत असल्याचे दिसल्याने सदरची मोटार सायाकल कोंढवा वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत निंबाळकर यांनी त्यांना थांबवुन त्यांचेकडे लायसन्सची विचारणा केली असता,त्यांनी उलट उर्मटपणे पोलीस निरीक्षक श्री.निंबाळकर यांना धक्का-बुक्की करुन रस्त्यावरील बॅरिकेट उचलुन बाजुला फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला असता फिर्यादी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस नाईक श्री.अमित सस्ते व त्याचे सहकारी कर्मचारी यांनी आरोपी १) रजनिकांत नागोराव कांबळे (वय २३, रा.मु.पो.साबळेवाडी,ता.खेड,जि.पुणे), २) प्रसाद दत्तात्रय रामापुरे (वय २२), ३) सुर्यकांत आनंता फुगारे (वय २२, रा. लक्ष्मी नगर,कोंढवा,पुणे ) यांना पकडून कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देत कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुरन कलम १७७/२०२० भादविकलम ३५३,५०४,३४,सह मोव्हेॲक.३(१),१८१,५/१८०,१२८/१७७ अन्वय प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे आरोपींना दाखल गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावत येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages