🚨 रिक्षात हरविलेली १४ लाख रुपयांचे सोने असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधून मूळमालकास परत केली.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 5, 2020

🚨 रिक्षात हरविलेली १४ लाख रुपयांचे सोने असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधून मूळमालकास परत केली..

🚨 रिक्षात हरविलेली १४ लाख रुपयांचे सोने असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधून मूळमालकास परत केली..
दहिसर परिसरात रिक्षात हरविलेली १४ लाख रुपयांचे सोने असलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तीन तासात शोधून काढून मालकाला दिलासा दिला. दहिसर पोलिसांच्या कामगिरीमुळे अमेय टिकेकर यांना सुमारे ३५५ ग्रॅम वजनाचे १४ लाख रुपये किमतीचे सोने माघारी मिळाले.
अमेय हे कुटुंबासह नातेवाईकाच्या लग्नासाठी रविवारी बोरिवली येथे गेले होते. त्यावेळी रात्री घरी येत असतांना त्यांची बॅग रिक्षात राहिली. या बॅगेत सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोने होते. रिक्षातून उतरल्यावर काही वेळाने बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी दहिसर पोलीस ठाणे गाठत बॅग हरविल्याची तक्रार टिकेकर यांनी रात्री साडेदहा वाजता पोलिसांना दिली. त्यानुसार दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून टिकेकर यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा गाडी क्रमांक मिळविला. त्यानुसार आरटीओ अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्षाची माहिती मिळवून रिक्षाचालकाचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक प्राप्त केला. पोलिसांनी रिक्षाचालकाशी संपर्क साधून टिकेकर यांची हरविलेली बॅग परत मिळविली. पोलिसांनी जलद गतीने तपास करून तीन तासांच्या आत टिकेकर यांना त्यांची बॅग परत केली.

Post Bottom Ad

#

Pages