कोंढव्यात "कर्तव्यदक्ष पोलिसांचा" सत्कार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 14, 2020

कोंढव्यात "कर्तव्यदक्ष पोलिसांचा" सत्कार..

✍🏻 भूषण गरुड

💐 कोंढव्यात "कर्तव्यदक्ष पोलिसांचा" सत्कार..

पुण्यात काही ठिकाणी एटीएम चोरीच्या घटना घडत असतांना. कोंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बँक ऑफ बडोदाचे ATM फोडणाऱ्या चोरांचा प्रयत्न फसल्याने एटीएममध्ये असलेले अकरा लाखा रुपयांचा अपहार वाचल्यामुळे बैंक ऑफ बडोदाचे मॅनेजर यांनी सहाय्यक पोलीस उपायुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनील कलगुटकर व कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्यासमवेत कोंढवा पोलिस ठाण्यात कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

अशाप्रकारे पोलिसांमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..
कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत रविवार दि.०९ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ०२.५० वा.सुमारास येवलेवाडी येथील सिंहगड कॉलेज समोरील बैंक ऑफ बडोदाचे ATM सेंटरमध्ये काही व्यक्ती काहीतरी करत असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्यास पुणे पोलीस नियंत्रण कक्ष येथुन प्राप्त झाल्यानुसार खडीमशिन पोलीस चौकीचे बीट मार्शल पोलीस शिपाई श्री.सागर सुर्यवंशी व पोलीस नाईक श्री.अर्जुन पवार यांना मिळालेल्या माहितीचे आधारे तात्काळ घटनास्थळी दाखल होत लागलीच याबाबतची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे नाईट S.H.O पोलीस उपनिरीक्षक श्री.निलेश चव्हाण व गुन्हे प्रगटीकरण शाखेकडील पोलीस शिपाई श्री.अझीम शेख, पोलीस शिपाई श्री.मोहन पिसाळ, पोलीस नाईक श्री.योगेश कुंभार हे घटनास्थळी लागलीच दाखल होत दोन्ही आरोपीना चोरी करण्याचे साहित्यास ताब्यात घेत आरोपी विरुध्द गु.र न १४०/२०२० नुसार भा.द.वि.कलम ३८०,५११,४२७ प्रमाणे कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
यावेळी बँक ऑफ बडोद्याचे ATM सेंटरमध्ये ११ लाख रोख रक्कम त्यामध्ये जमा होती. पोलीसांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे बँक ऑफ बडोद्याचे मॅनेजर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मा.साहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री.सुनिल कलगुटकर व कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस हवालदार श्री.लक्ष्मण जगताप, पोलीस शिपाई श्री.सागर सुर्यवंशी, पोलीस नाईक श्री.अर्जुन पवार, पोलीस नाईक श्री.योगेश कुंभार, पोलीस शिपाई श्री.अझीम शेख यांचे शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी सत्कार कार्यक्रमात, सहाय्यक पोलीस उपायुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनील कलगुटकर यांनी कोंढवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडणाऱ्या चोरांच्या प्रयत्न फसल्याने त्यावेळेस बँकेच्या एटीएम मध्ये 11 लाख रुपयांची रोख रकमेच्या अपहार वाचल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत नागरिकांना आवाहन केले की पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूला चुकीच्या काही घटना घडत असतील त्या पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या जेणेकरून पोलिसांच्या कर्तव्याने त्या गोष्टींना आळा बसेल व त्याला योग्य त्या प्रकारे शासन होईल, असे सांगितले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी कोंढवा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करत पोलीस कर्तव्यावर असताना कामगिरी केल्यावर कौतुकाची थाप थोपटल्याने पोलिसांना प्रेरणा मिळते या प्रेरणेच्या जोरावर भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास धजावत नाहीत व ते सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यास प्रेरित होत असतात असे सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages