एटीएसकडून पुण्यातील ड्रग्जचा कारखाना उध्वस्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 20, 2020

एटीएसकडून पुण्यातील ड्रग्जचा कारखाना उध्वस्त..

एटीएसकडून पुण्यातील ड्रग्जचा कारखाना उध्वस्त..

दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने 5 कोटी 60 लाख 60 हजार रुपयांचा 14 किलो 300 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पुण्याच्या सासवडमधून हस्तगत केला आहे. या प्रकरणी महेंद्र परशुराम पाटील (49) आणि संतोष बाळासाहेब आडके (29) यांना अटक केली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
19 फेब्रुवारीला एटीएसच्या जुहू युनिटच्या पथकास यापूर्वी अटक केलेल्या संतोष आडके याची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील श्री अल्फा केमिकल्स येथे एमडी बनविण्याची फॅक्टरी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता फॅक्टरीमध्ये 10 किलो 500 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ किंमत अंदाजे 4 कोटी 2 लाख आणि 1 कोटी 25 लाख रुपयांचा कच्चा माल (केमिकल) जप्त करण्यात आले. या दोन आरोपींकडून विलेपार्ले पूर्व आणि पुण्यातील जाधववाडी येथील कारखान्यातून 14 किलो 300 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला होता. या ड्रग्जची किंमत 5 कोटी 60 लाख 60 हजार इतकी आहे. एटीएसने एनडीपीएस कायदा कलम 22, 29 सह भा. दं. वि. कलम 8 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Post Bottom Ad

#

Pages