पुण्यात शरीरात सोने लपवून महिलेची तस्करी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 18, 2020

पुण्यात शरीरात सोने लपवून महिलेची तस्करी..

😱 पुण्यात शरीरात सोने लपवून महिलेची तस्करी..

विदेशातून वस्तू भारतात आणण्यासाठी जास्त खर्चिक असल्यामुळे लोकं कोणत्या मार्गाने वस्तू किंवा सोनं आणतील याचा काही नेम नाही. सोनं किंवा परदेशी चलनाची तस्करी करण्यासाठी तस्कर कोणत्या पद्धतीचा अवलंब करतील याचा थांगपत्ता पोलिसांना देखील लागत नाही. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने शेंगदाण्यात विदेशी नोटा लपवून आणल्या होत्या. आता तर एका महिलेने चक्क आपल्या शरीरातील खासगी भागात सोने लपवून आणले असता विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईतून पुण्यात आलेली महिला मरियम मोहम्मद सलीम शेख ही विमानतळावरील स्कॅनरमधून जात असताना अधिकाऱ्यांना तिचा संशय आल्याने तिला कस्टम डिपार्टमेंटने ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने सोने लपवण्यासाठी ज्या प्रकारे शक्कल लढवली हे पाहून झडती घेणारे पोलीस देखील चक्रावून गेले. यानंतर वैद्यकीय पथकाला पाचारण करून तिची तपासणी केली असता तिने शरीराच्या खासगी भागात (गुदाशय) मध्ये लपवलेली सोन्याची बिस्किटे जप्त केली. या सोन्याच्या बिस्किटांची आंतरराष्ट्रीय बाजारात वीस लाख रुपये आहे. सदर घटनेचा पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर सर्व प्रवाशांना पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे. तस्करी हा प्रकार बेकायदेशीर असल्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकेल अशा गोष्टी करू नयेत असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

Post Bottom Ad

#

Pages