😱 A young man was attacked with sharp weapons at Sahakanagar in Pune .. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 3, 2020

😱 A young man was attacked with sharp weapons at Sahakanagar in Pune ..

😱 पुण्यात सहकानगर येथे एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार..
पुणे शहरात सहकानगर येथील ट्रेझरी पार्क सोसायटीसमोर सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून जखमी केले असल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल होत जखमी तरुणास उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सुरज भगत असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात सुरज भगत जखमी झाला असून पोलिसांनी त्यास तत्काळ उपचारांसाठी ससून रूग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. 

सहकानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी दिलेल्या माहितीनुसार,
सहकारनगरमधील ट्रेझरी पार्क येथे एका तरुणावर हल्ला झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भगत याच्या हातावर व गुडघ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे व तो जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्यास तत्काळ उपचारांसाठी ससून रूग्णालयामध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. हा प्रकार कशामुळे झाला, किती जणांनी केला, याचा शोध सहकारनगर पोलिस घेत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages