पुणे म.न.पा कचरा व राडारोडाप्रकरणी संबंधित खात्यांची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 18, 2020

पुणे म.न.पा कचरा व राडारोडाप्रकरणी संबंधित खात्यांची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश..

💁‍♂ पुणे म.न.पा कचरा व राडारोडाप्रकरणी संबंधित खात्यांची चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश..

राडारोडाप्रकरणी संबंधित खात्यांची आणि अधिकाऱ्यांची सविस्तर चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले. यावर श्री.आयुक्त शेखर गायकवाड यांनी चौकशी अहवाला बरोबरच ऑडीट रिपोर्टही सादर करणार असल्याचे सांगितले.

मनसेचे गटनेते श्री.वसंत मोरे यांनी रादरोड्यात साडेसात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यांनतर सर्वोपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. नोव्हेंबर 2018 मध्ये हे प्रकरण आहे. 6 हजार 972 उचलल्याचा दावा करण्यात येत आहे. कॉल सेंटरवर फोन करून राडारोडा उचलून न्यायचा आहे.
सुमारे 4 हजार 33 गाड्या कात्रज – कोंढवा, कर्वेनगर 1 हजार 343 गाड्या उचलण्यात आला. या ठेकेदाराला 1 साईड बाजू बिल द्यायचे होते. 20 किलोमीटर बिल द्यायचे होते. 30 किलोमीटर पुणे शहर संपते. या ठेकेदाराला 56 किलोमीटर बिल देण्यात आले. ड्रेनेज आणि रोड विभाग वेगवेगळे बिल दिले. 3 – 3 आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाचा अर्थ काय, राडारोडा काढू नये म्हणू नये म्हणून सांगितले तरीही वार्ड ऑफिसमध्ये राडारोडा काढण्याचे टेंडर काढले जाते, असे मनसेचे गटनेते श्री.वसंत मोरे यांनी सांगितले.
एवढा राडारोडा उचलला असता तर पुणे शहरात कुठेही राडारोडा दिसला नसता, ड्रेनेज, घनकचरा, विभागाच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांनी चौकशी करावी. पुणेकरांच्या पैशाची लूट थांबवा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

पुणे महापालिकेत अनागोंदी कारभार चालला आहे. ठेकेदार, अधिकारी शोधले पाहिजे. विचित्र कारभार सुरू झाला आहे. देशात सर्वात भ्रष्ट महापालिका असेल तर, पुणे महापालिका असेल. हा नियोजन पध्दतीने केलेला कट आहे. या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, या ठेकेदाराला महापालिका खिशात असल्या सारखे वाटते, अशा शब्दांत स्वीकृत नगरसेवक श्री.सुभाष जगताप यांनी हल्लाबोल केला.

कर्वेनगर भागातून 1300 ट्रक राडारोडा उचलल्याचे सांगण्यात येते. पण 13 ट्रक ही राडारोडा उचलला नाही. मग संपूर्ण शहरातील राडारोडा आमच्या भागात होता का? असा सवाल नगरसेवक श्री.सुशील मेंगडे यांनी उपस्थित केला.

राडारोडा काय प्रकार आहे?, प्रत्येकाचे राडारोड्यावर पैसे आहेत. 282 गाड्या राडारोडा उचलला, यावर नियंत्रण यावे, हा पैशाचा अपव्यय थांबला पाहिजे, असे नगरसेवक श्री.अजय खेडेकर म्हणाले.

शहरातील राडारोडा तातडीने उचलला पाहिजे. काम करून गेल्यावर राडारोडा उचलला जात नसल्याचे सभागृह नेते श्री.धीरज घाटे यांनी सांगितले.

राडारोडा उचलताना टोल फ्री क्रमांक दिलाय, जीपीएस लावले, 16, 14, किलोमीटर अंतर आहे. 57 किलोमीटर अंतर तपासून घेऊ, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख श्री.ज्ञानेश्वर मोळक म्हणाले.

Post Bottom Ad

#

Pages