🏪 पाच दिवसाचा आठवडा यांना लागू नाही.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 12, 2020

🏪 पाच दिवसाचा आठवडा यांना लागू नाही..

🏪 पाच दिवसाचा आठवडा यांना लागू नाही..
ठाकरे सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 29 फेब्रुवारी पासून पाच दिवसांचा आठवडा सुरु केला आहे. यापुढे आता केंद्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील शनिवार आणि रविवार सुट्टी मिळणार आहे. मात्र सरसकट सर्वच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध होणार नाही. तर ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयाना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना पाच दिवसाचा आठवडा लागू नाही.
सर्व कार्यालयांसाठी एकच वेळ :
सर्व कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी 9.45 ते सायं. 5.30 अशी आहे. ती आता 9.45 ते सायं. 6.15 अशी होईल. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायं. 6.30 अशी राहील. बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी देखील ही वेळ 9.45 ते सायं. 6.15 अशी राहील. बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी 10.00 ते सायं. 5.45 अशी कामाची वेळ सध्या आहे. मात्र आता पाच दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयाना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे.
पाच दिवसाचा आठवडा यांना लागू नाही..
अत्यावश्यक सेवा :
शासकीय रुग्णालये, चिकित्सालये, पोलीस, कारागृहे, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निमशन दल, सफाई कामगार.
शैक्षणिक संस्था :
शासकीय महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, तंत्रनिकेतने.
जलसंपदा विभाग :
दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, अष्टी, खडकवासला, नाशिक व नांदेड येथील कार्यशाळा, नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कार्यशाळा तसेच जलसंपदा व सार्वजनिक विभागांतर्गत क्षेत्रिय कामावरील व प्रकल्पांवरील नियमित आस्थापना, स्थायी व अस्थायी आस्थापना व रोजंदारीवरील क्षेत्रिय कामगार व कर्मचारी.
सार्वजनिक आरोग्य विभाग :
व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर.
महसूल व वन विभाग :
बल्लारशा, परतवाडा व डहाणू येथील एकात्मिकृत घटके, अलापल्ली येथील सॉ मिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा व बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये, पुणे.
सामान्य प्रशासन विभाग :
शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग.
कृषी विभाग :
दुग्धशाळा विकास विभागांतर्गत दुग्ध योजना.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग :
शासकीय मुद्रणालये.
कौशल्य व उद्योजकता विकास :
सर्व आयटीआय.
केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू आहे.  सध्या दुसरा व चौथा शनिवार कार्यालयीन सुट्टी असते. पाच दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचे डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाना वेळ देणे शक्य होवून त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.

Post Bottom Ad

#

Pages