पुणे पोलिसांची; क्यू.आर.कोड स्कॅनद्वारे उपस्थिती नोंदणीकृत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 20, 2020

पुणे पोलिसांची; क्यू.आर.कोड स्कॅनद्वारे उपस्थिती नोंदणीकृत..

पुणे पोलिसांची; क्यू.आर.कोड स्कॅनद्वारे उपस्थिती नोंदणीकृत..

पुणे शहरातंर्गत कायदा सुव्यवस्था आणखीन सक्षम करण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांसह चौक्यांच्या हद्दीत आता पोलिसांकडून क्यू.आर.कोड बसविण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक कर्मचारी, दामिनी पथक, पेट्रोलिंग कर्मचारी अधिकाऱ्याची उपस्थिती नोंदणीकृत केली जात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेकडून 449, दामिनी पथकाकडून 470 आणि पोलीस ठाण्यांकडून 2962 असे एकूण 3881 क्यू.आर.कोड बसविण्यात आले आहेत.

पेट्रोलिंग करण्यासाठी नियुक्ती असलेल्या कर्मचाऱ्यांना यापुर्वी रजिस्टरवर स्वाक्षरी करुन उपस्थिती नोंदविण्यात येत होती. मात्र, थर्ड आय कार्यप्रणालीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाकडून क्यू.आर पेट्रोलिंग अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यांसह चौक्यांच्या हद्दीत क्यू.आर.कोड बसविण्यात आले. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह दामिनी पथक, वाहतूक कर्मचाऱ्याना क्यू.आर.कोड स्कॅन करुन उपस्थिती लावावी लागत आहे. पेट्रोलिंगदरम्यान दामिनी पथकाकडू स्कॅन केलेल्या क्यू.आर.कोडचे नियत्रंण गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. तर वाहतूक नियमनासाठी महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या क्यू.आर.कोडचे स्कॅनिंग करुन उपस्थिती लावावी लागत आहे. तसेच पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेल्या बीट मार्शल, सीआर मोबाईल, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या क्यूआर कोड स्कॅनचे नियंत्रण संबंधित पोलिस ठाण्यांकडून करण्यात येत आहे.

पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याकडून पेट्रोलिंगसह गस्तीदरम्यान संवदेशनशील ठिकाणांना भेटी देण्यात येतात. त्याठिकाणी पाहणी करुन कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधिताकडून क्यू.आर.कोड स्कॅन केले जात आहेत. क्यू.आर.कोड स्कॅन केलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नोंद थर्ड आय प्रणालीमध्ये केली जात असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्यू.आर.कोड स्कॅन केल्यानंतर उपस्थिती नोंदणीकृत होत असल्यामुळे गुन्हेगारी घटण्यास मदत झाली आहे. तसेच पोलिसांकडून प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यानंतरच उपस्थिती नोंद केली जात असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.

पोलीस आयुक्त डॉ.श्री.के.व्यंकटेशम..
शहरातंर्गत कायदा सुव्यवस्था आणखीन सक्षम करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांसह चौक्यांच्या हद्दीत पेट्रोलिंगसाठी क्यू.आर.कोड उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे कर्मचारी, बीट मार्शल, दामिनी पथक, वरिष्ठ अधिकाऱ्यानां क्यू.आर.कोड स्कॅन करून उपस्थिती नोंदवावी लागत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत झाली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.श्री.के.व्यंकटेशम यांनी दिली.

Post Bottom Ad

#

Pages