🚨 कोंढव्यात 'स्पा'च्या नावावर वेश्या व्यवसाय उघड.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 7, 2020

🚨 कोंढव्यात 'स्पा'च्या नावावर वेश्या व्यवसाय उघड..

✍🏻 भूषण गरुड

🚨 कोंढव्यात 'स्पा'च्या नावावर वेश्या व्यवसाय उघड..
कोंढवा परिसरातील एन.आय.बी.एम. रोडवरील गोल्डन जिम शेजारील 'यंग स्पा'मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिस नाईक सुशिल धिवार यांना मिळाली. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी या 'यंग स्पा'वर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर छापा घालण्यात आला. यामध्ये ०४ तरुणींकडून वेश्या व्यवयाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. 'यंग स्पा'च्या चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलीस ठाणे येथे आणत त्यांचे विरुध्द इटपा कलम ३.४.५ गुरन १२८/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार दि.०५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ०३.०० वा. सुमारास कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलिस नाईक सुशिल धिवार यांना बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, एन.आय.बी.एम.रोडवरील गोल्डन जिम शेजारील 'यंग स्पा'मध्ये मसाजच्या नावाखाली तरुणींकडून वेश्या व्यवयाय करवून घेतला जात असल्याची बातमी प्राप्त होताच ही माहिती त्यांनी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस नाईक सुशिल धिवार यांनी दिलीप पवार (रा. मार्केटयार्ड,पुणे) यास बनावट ग्राहक बनवून एन.आय.बी.एम.रोडवरील गोल्डन जिम शेजारील 'यंग स्पा'मध्ये पाठवुन तेथे देहव्यापार चालतोका याची सांकेतिक भाषेत खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस हवालदार सुरेश भापकर, पोलिस नाईक सुशिल धिवार, पोलीस नाईक अमोल फडतरे, पोलीस नाईक गणेश आगम, पोलीस शिपाई किरण मोरे, पोलीस शिपाई खाडे, महिला पोलीस शिपाई कोळेकर यांनी त्या ठिकाणी दोन पंचांच्या समक्ष छापा टाकून महिलांकडून अनैतिक देहव्यापार करून घेणारे आरोपी नवीन चुनीलाल शहा, अकिंत नवीन शहा यांना ताब्यात घेत त्यांच्या तावडीतून ०४ पिडीत महिलांची सुटका करत पिडीत मुली व आरोपी नवीन चुनीलाल शहा, अकिंत नवीन शहा यांना कोंढवा पोलीस ठाणे येथे पुढील कारवाईसाठी आणत त्यांचे विरुध्द इटपा कलम ३.४.५ गुरन १२८/२०२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी यांच्या सुचनांप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे, पोलीस नाईक श्री.अमोल फडतरे, पोलीस नाईक श्री.गणेश अगम, पोलीस शिपाई श्री.खाडे, महिला पोलीस शिपाई सौ.कोळेकर यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages