चोरीच्या गुन्हयाचा तपास करतांना आरोपींनी अडीच वर्षापुर्वी केलेल्या खुनाचा झाला उलगडा; आरोपीना कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 28, 2020

चोरीच्या गुन्हयाचा तपास करतांना आरोपींनी अडीच वर्षापुर्वी केलेल्या खुनाचा झाला उलगडा; आरोपीना कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद..

चोरीच्या गुन्हयाचा तपास करतांना आरोपींनी अडीच वर्षापुर्वी केलेल्या खुनाचा झाला उलगडा; आरोपीना कोंढवा पोलीसांनी केले जेरबंद..

पुणे शहरात अॅपे रिक्षा टेम्पोच्या चोऱ्या करणाऱ्या संशयीत आरोपीची बातमी कोंढवा तपास पथकातील पोलीस शिपाई श्री.ज्योतिबा पवार यांना मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपीनां ताब्यात घेत चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता आरोपींनी लूटमारीच्या उद्देशाने जबरदस्तीने संगणमत करून अपहरण केलेल्या २४ वर्षीय मुलाकडून पर्स व इतर साहीत्य जबरदस्तीने काढून घेत असताना मुलाने विरोध केल्याने आरोपीनी चिडून जावून मुलाच्या डोक्यामध्ये दगड घालून जिवे ठार मारून खून केल्याची अडीच वर्षापूर्वीच्या घटनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चार आरोपींना मिळून पुणे येरवडा कारागृहातील सेवानिवृत्त पोलीस हवालदार श्री.अनिल लोंढे यांच्या २४ वर्षीय मुलाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं.१९३/२०२० भादंविसं क.३०२,३९७,३६४,२०१,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपींना अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना दि.०३ मार्च २०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाविद्यालयीन २४ वर्षीय मुलाच्या खूनचे आरोपी
१) वसिम अजमल खान (वय ३०, रा.शिवनेरीनगर,कोंढवा खुर्द,पुणे. मुळगांव नरोदाबाद ता.जि.जळगांव),
२) इमरान रौफ शेख (वय २०, रा. शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे. मुळगांव मुक्ताईनगर, मेदलाबाद चाळीसगांव,जि.जळगांव),
३) अहमद आयुब खान (वय २५, रा. शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे. मुळगांव नसराबाद जि.जळगाव) यांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि नंबर व कलम २७०/२०२० भादवि कलम ३०२,३९७,३६४,२०१,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
४) (मयत आरोपी) शाहरूख ऊर्फ खड्डया नूर हसन खान (वय १९, रा.शिवनेरीनगर,कोंढवा,पुणे) याच्या खून झाला असून याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.स्वराज पाटील पुढील तपास करत आहेत.

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२० रोजी कोंढवा तपास पथकातील पोलीस शिपाई श्री.ज्योतिबा पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयीत इसम हे अॅपे रिक्षा टेम्पो चोरी करतात व त्यांनी बऱ्याच रिक्षा टेम्पोच्या चोऱ्या केलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कोंढवा तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे व तपास पथकातील अंमलदार संतोष नाईक, पोलीस नाईक अमित साळुके, पोलीस नाईक निलेश वणवे, पोलीस नाईक संजीव कळंबे, पोलीस नाईक सुशिल धिवार, पोलीस शिपाई ज्योतीबा पवार, पोलीस शिपाई किशोर वळे, पोलीस शिपाई उमेश शेलार, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, पोलीस शिपाई किरण मोरे यांच्या तपास पथकाने सापळा रचून वसिम खान, बाबा ऊर्फ रमजान शेख व अन्सार खान (सर्व रा. कोंढवा खुर्द,पुणे) या तिन संशयीत इसमांना ताब्यात घेत चौकशीकामी कोंढवा पोलीस ठाण्यात आणत संशयीत इसमांकडे चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करीत असता आरोपी यांनी कोंढवा पोलीस ठाणे ३, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे १ व समर्थ पोलीस ठाणे १ असे एकूण ५ अॅपे रिक्षा टेम्पो चोरी केल्याची कबुली दिल्याने कोंढवा पोलीस ठाणेमधील गु.र.नं.२७०/२०१८ भादंविसं क. ३७९ प्रमाणे कोंढवा पोलिसांनी दाखल गुन्हयात आरोपींना अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना दि.२९ फेब्रुवारी २०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोंढवा पोलीस आरोपीकडून चोरीच्या गुन्हयातील टॅम्पोची रिकव्हरी करत आहे.

कोंढवा पोलीसांनी आरोपींकडून असा केला खुनाचा उलगडा..
अटकेतील आरोपींकडे अॅपे रिक्षाचे चोरीच्या गुन्हयाचे अनुषंगाने तपास करीत असताना आरोपी वसिम अजमल खान (वय-३०) हा काही तरी महत्वाचे लपवून ठेवत आहे व माहिती द्यावयास टाळाटाळ करीत आहे, आरोपीने नक्कीच काहीतरी गंभीर गुन्हा केल्याची शंका आल्याने गुन्हयाची उकल करणेकामी मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचेमा.सहा.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.सुनिल कलगुटकर यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे तपास पथकातील पोलीसांनी आरोपी वसिम खान याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने २८ ऑगस्ट २०१७ रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास रोजी एका महाविद्यालयीन २४ वर्षाच्या मुलास पुणे रेल्वे स्टेशन जवळील सद्ल बल्ला येथून लूटमारीच्या उद्देशाने जबरदस्तीने संगणमत करून आरोपी वसिम अजमल खान (वय-३०), इमरान रौफ शेख (वय-२०), अहमद आयुब खान (वय-२५), (मयत आरोपी) शाहरूख ऊर्फ खड्डया नूर हसन खान (वय-१९) यांनी अहमद आयब खान यांच्याकडील रिक्षा क्र. एम.एच.१२ डा.जा.३८८५ यामध्ये जबरदस्तीने बसवून पुण्यातील कोंढवा येथील पडीक व निर्मनुष्य स्थळी पारसी मैदानात आणुन त्याच्याकडील पर्स व इतर साहीत्य जबरदस्तीने काढून घेत असताना अपहरण केलेल्या २४ वर्षीय मुलाने विरोध केल्याने आरोपीनी चिडून जावून मुलाच्या डोक्यामध्ये दगड घालून जिवे ठार मारून त्याचा खून करून पळून जाताना खून केलेल्या मयत मुलाच्या जवळील कागदपत्र येवलेवाडी याठिकाणी राहणारा आरोपीचा एक मित्र याच्याकडे ठेवल्याचे सांगितल्याने त्याठिकाणी जावून आरोपीच्या मित्राने आरोपीने त्याच्याकडे ठेवण्यास दिलेला एक झेरॉक्स कागद घरातुन शोधुन काढुन दिला. आरोपीच्या मित्राने शोधुन दिलेला कागद हा येरवडा कारागृह पुणे येथील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार श्री.अनिल आर. लोंढे याच्या ओळख पत्राची झेरॉक्सची होती. ओळख पत्राच्या झेरॉक्स वरून तपास केला असता, श्री.अनिल आर. लोंढे हे विसापूर कारागृह येथून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून सध्या ते रिक्षा चालवत आहेत अशी माहिती मिळताच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोंढवा पोलीस ठाण्यास बोलावुन माहिती घेतली असता, त्यांनी त्यांचा मुलगा निखील अनिल लोंढे, वय - २४ वर्षे हा दि.२७ ऑगष्ट २०१७ रोजी मिसींग झाल्याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यास तक्रार दिल्याचे सांगितले. मुलाच्या मृत्यूप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यास अ.म.र.नं.१३४/२०१७ दाखल गुन्ह्यांमधील अपमृत्यु मयताचे फोटो, हातातील फ्रेंडसीप बँड, बुट, इत्यादीचे फोटो त्याच्या आई-वडीलांना दाखवले असता त्यांनी हे मयत त्यांच्याच मुलाचे असल्याचे ओळखले.

एकंदरीत कोंढवा पोलीसांनी केलेल्या तपासावरून लुटण्याच्या उद्देशाने आरोपी वसिम खान, इमरान शेख, अहमद खान, मयत शारुख ऊर्फ खड्डया खान (मयत) यांनी खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुध्द वरील अकस्मात मृत्यु क्र. १३४/२०१७ चे चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री.अबुजर चाऊस यांच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं.१९३/२०२० भादंविसं क.३०२,३९७,३६४,२०१,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात आरोपींना अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपींना दि.०३ मार्च २०२० रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कामगिरी,
मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री.सुनिल फुलारी, मा.पोलीस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे, मा.सहा.पोलीस
आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचना प्रमाणे कोंढवा तपास पथकाचे मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.चेतन मोरे
तपास पथकातील अंमलदार श्री.संतोष नाईक, पोलीस नाईक श्री.अमित साळुके, पोलीस नाईक श्री.निलेश वणवे, पोलीस नाईक श्री.संजीव कळंबे, पोलीस नाईक श्री.सुशिल धिवार, पोलीस शिपाई श्री.ज्योतीबा पवार, पोलीस शिपाई श्री.किशोर वळे, पोलीस शिपाई श्री.उमेश शेलार, पोलीस शिपाई श्री.आदर्श चव्हाण, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages