🚨 कपडा चोरांच्या कोंढ़वा पोलीसांनी आवळल्या मुसक्या.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 10, 2020

🚨 कपडा चोरांच्या कोंढ़वा पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

🚨 कपडा चोरांच्या कोंढ़वा पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

✍🏻 भूषण गरुड : कपड्याच्या दुकानात जाऊन घरात कार्यक्रम असल्याचे सांगत कपडे खरेदीचा बहाना करत कपडा व्यावसायिकाला गुंगारा देत महागडे कपडे चोरी करण्याच्या घटना कोंढवा परीसरात घडल्या होत्या. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा तपासकामी कोंढ़वा पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलिसांनी गुन्हे झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करत त्याआधारे तपास करीत असतांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १,०८,९५०/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत कोंढवा पोलीस स्टेशन येथील अभिलेखावरील तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

कपड्याचे दुकानातुन कपडे चोरणारे आरोपी
१) जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३२, रा.स्टार सिटी, सोसायटी,मांजरी,पुणे)
२) मिलींद वासुदेव करंडे (वय २५, रा. केशवनगर, मुंढवा,पुणे) यांस गु.र.क्र.९६/२०२० भा.द.वी ३८० प्रमाणे कपडे चोरीचा गुन्हा कोंढवा पोलिस ठाणे येथे दाखल करत १,०८,९५०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत ३ गुन्हे उघडकीस आणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहर कोंढवा परिसरात घरात कार्यक्रम असल्याचे भासवत कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या उद्देशाने आल्याचे दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बघत व्यावसायिकाला गुंगारा देत महागड्या कपड्याची चोरी करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. कोंढवा पोलिस ठाण्याच्या अभिलेखा वरील गु.र.क्र.९६/२०२० भा.द.वी ३८० गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलिसांना सदर गुन्हयात आरोपी मोटर सायकल वापरत असल्याचे निष्पण झाले. गुन्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी चोरी करून जात असलेल्या २० किलोमीटर पयेँत मार्गाचा तपास पथकातील पो.शि.किशोर वळे, पो.शि.उमेश शेलार यांना शोध घेत असतांना मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी केशवनगर, मुंढवा येथे असल्याची माहिती मिळताच ही माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड व पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोंढवा तपास पथकातील पो.ना. अमित साळुके, पो.ना.संजीव कळंबे, पो.शि.जोतिबा पवार, पो.हवा.संतोष नाईक , पो.ना. निलेश वणवे, पो.ना. संजीव कळंबे, पो.शि.आदशेँ चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून आरोपी १)जयेश चंद्रशेखर खिच्ची (वय ३२, रा.स्टार सिटी, सोसायटी,मांजरी,पुणे), २)मिलींद वासुदेव करंडे (वय २५, रा. केशवनगर,मुंढवा,पुणे) यांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपीनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून कोंढवा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील १) गु.र.क्र.९४२/१९ भादवी कलम ३८०
२) गु.र.क्र.१०१७/ १९ भादवी कलम ३८०
३) गु.र.क्र.९६/२०२० भा.द.वी ३८०
दाखल गुन्हे तपास पथकाच्या पोलिसांनी उघडकीस आणत एकुण १,०८९५०/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची कामगीरी,
मा.श्री.सुनिल फुलारी सो,अपर पोलीस आयुक्त, पु.प्रा.वि.पुणे, मा.श्री.सुहास बावचे सो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5, मा.श्री.सुनील कलगुटकर सो,सहा.पोलीस आयुक्त,वानवडी विभाग पुणे, मा.श्री.विनायक गायकवाड सो.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो.कोंढवा पोलीस ठाणे, मा.श्री.महादेव कुंभार सो.पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे तपास पथकाचे स.पो.नि.चेतन मोरे, पो.हवा.संतोष नाईक, पो.ना- निलेश वणवे,अमित साळुंखे, संजीव कळंबे, पो.शि- जोतिबा पवार,उमेश शेलार,आदशेँ चव्हाण, किशोर वळे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages