प्रमाणपत्र न घेता 'हापूस आंबा'च्या नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 26, 2020

प्रमाणपत्र न घेता 'हापूस आंबा'च्या नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई..

प्रमाणपत्र न घेता 'हापूस आंबा'च्या नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाई..

हापूस आंब्याच्या नावाखाली अन्य राज्यातील आंबा विक्रीस प्रतिबंध करण्याबरोबरच येथील हापूस विक्रीसाठी आता जी.आय.मानांकन अनिवार्य करण्यात आला आहे. प्रमाणपत्र नसल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते. यासाठी हापूस आंबा उत्पादक, शेतकरी, विक्रेते, अडते, पुरवठादार, निर्यातदार, किरकोळ विक्रेते, पॅकींग साहित्य उत्पादक, प्रक्रिया उद्योजक आणि रोपवाटिकाधारक यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन देवगड येथील आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आणि सहकार्य संस्थेकडून करण्यात येणार आहे.

जी.आय.नोंदणी अनिवार्य..
हापूस कोकणातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेले पीक आहे. याची विक्री करताना जी.आय.नोंदणी सर्टिफिकेशन असणे आवश्यक आहे. हापूस आंब्याशी संबधित सर्वच व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक झाले आहे. कर्नाटक किंवा अन्य राज्यातील आंबा यापुढे देवगड किंवा हापूसच्या नावाखाली विक्री करता येऊ नये यासाठी कोकणातील पाच जिल्ह्यातील सर्व आंबा शेतकरी आणि संबंधित व्यवसायिकांना प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

'जी.आय' नसल्यास कारवाई..
यामुळे अनधिकृत होणाऱ्या हापूस आंबा विक्रीस अटकाव करता येईल. यासाठीची नोंदणी प्रक्रिया संस्थेच्या जामसंडे येथील कार्यालयात सुरू आहे. तसेच यंदापासून प्रमाणपत्र न घेता हापूस आंबा म्हणून विक्री करणाऱ्या अथवा हापूस आंबा संबंधित उत्पादने हापूस नावाखाली विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर जी.आय.सेक्रेटरीमीर्फत कडक कारवाई होऊ शकते. यासाठी प्रमापत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे २५० शेतकरी, व्यावसायिकांनी आपली नोंदणी केली असून त्यापैकी बऱ्याच जणांना प्रमाणपत्र आणि जी.आय.नोंदणी क्रमांकही प्राप्त झाले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages