🚨 दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सनि भरगुडेला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 7, 2020

🚨 दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सनि भरगुडेला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक..

✍🏻 भूषण गरुड

🚨 दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सनि भरगुडेला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक..
पुणे पोलिसांनी ०२ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले असतांनाही तडीपार आदेशाचा भंग करुन कोणतीही पुर्व परवानगी न घेता कोणतातरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे हेतूने एक लोखडी कोयता जवळ बाळगणाऱ्या गुंडाची बिबवेवाडी पोलीस शिपाई अतुल महांगडे यांना बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या बातमीच्या आधारे पापळ वस्ती येथील विहरीजवळ, बिबवेवाडी याठिकाणी गुरुवार दि.०६ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ०७.१५ वा.सुमारास पोलिसांनी सापळा रचून तडीपार सराईत गुंड सनि संतोष भरगुडे याला अटक केली. पुणे पोलिसांनी सनि भरगुडे याला ०५ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ५५ प्रमाणे ०२ वर्षाकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तलया व पुणे जिल्हयातून शिरवळ, जि.सातारा येथे तडीपार केले आहे.

बिबवेवाडी पोलीसांनी तडीपार आरोपी सनि संतोष भरगुडे (वय २१, रा.निलेश कॉम्पलेक्स, पापळ वस्ती, बिबवेवाडी,पूणे) याला अटक करत त्याच्याकडून एक लोंखडी कोयता मिळून आल्याने त्याच्या विरुध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ सन २०१२ कलम १४२ व भारतीय हत्यार कायदा कलम ४ सह २५ प्रमाणे बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बिबवेवाडी परिसातील सराईत गुन्हेगारांची झडाझडती तसेच फरारी आरोपींचा शोध, गुन्हें प्रतिबंधात्मक करण्याकामे बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी आदेशीत केल्यानूसार पोलीस स्टेशन हद्दीत गुरवार दि.०६ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री ०७.१५ वा.सुमारास अप्पर ओटा,२७६,बिबवेवाडी येथे सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे आणि त्यांचे कर्मचारी खासगी वाहनाने पेट्रोलींग करत असतांना पोलीस शिपाई अतुल महांगडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुंड पापळ वस्ती येथील विहरीजवळ, बिबवेवाडी येथे संशयीतरित्या थांबला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळताच सहा.पोलीस निरीक्षक श्री.किरण पावसे, सहा.पोलीस उप-निरीक्षक उसगांवकर, पोलीस हवालदार रविद्र चिप्पा, पोलीस शिपाई मोरे, पोलीस शिपाई अतुल महांगडे, पोलीस शिपाई कुलकर्णी, पोलीस शिपाई रुपनर व पोलीस शिपाई शेडगे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पापळ वस्ती येथील विहरीजवळ, बिबवेवाडी याठिकाणी सापळा रचून बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील ०२ वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी सनि संतोष भरगुडे (वय २१, रा.निलेश कॉम्पलेक्स, पापळ वस्ती, बिबवेवाडी,पूणे) याला अटक करत त्याची अंगझडती घेतीली असता त्याच्याकडून एक लोंखडी कोयता जप्त करत त्याच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७(१) सह १३५ सन २०१२ कलम १४२ व भारतीय हत्यार कायदा कलम ४ सह २५ प्रमाणे बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी,
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनानूसार व सूचनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक किरण पावसे, सहा.पोलीस उप-निरीक्षक उसगांवकर, पोलीस हवालदार रवि चिप्पा, पोलीस शिपाई - अतुल महांगडे, मोरे, कुलकर्णी, रुपनर, शेडगे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages