धक्कादायक..मोलकरीण स्वतःच्या लघवीने खरकटी भांडी धुवायची; सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, February 23, 2020

धक्कादायक..मोलकरीण स्वतःच्या लघवीने खरकटी भांडी धुवायची; सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड..

धक्कादायक..मोलकरीण स्वतःच्या लघवीने खरकटी भांडी धुवायची; सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड..

उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार घडला आहे. इथल्या एका घरात काम करणाऱ्या मोलकरणीने स्वतःच्या लघवीने खरकटी भांडी धुतल्याचं उघड झालं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गाजियाबाद शहरातील इंदिरापुरम इथल्या रहिवासी इमारतीत ही महिला अनेक घरांमध्ये मोलकरणीचं काम करते. यातील एका फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. दोन दिवसांपूर्वी या घरमालकाने ऑफिसवरून परतल्यानंतर सहज म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यात चित्रीत झालेला प्रकार पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याची मोलकरीण तिच्या लघवीने घरातील भांडी धूत असल्याचं दिसून आलं. ही महिला आधी घरातली सर्व भांडी घासून धुवून घेत होती आणि मग एका भांड्यात लघवी करून त्यात ती धुतलेली भांडी पुन्हा धूत होती. ही मोलकरीण जवळपास दोन वर्षं या फ्लॅटमध्ये काम करत होती. त्यामुळे तिने केलेल्या या कृत्याचं फुटेज पाहून धक्का बसलेल्या या घरमालकाने तिच्याकडे या प्रकाराची विचारणा केली. मात्र, तिने असं काही करत असल्याचं साफ नाकारलं. तेव्हा घरमालकाने थेट पोलीस ठाणं गाठलं आणि या मोलकरणीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

सदर रहिवासी संकुलात या प्रकरणाविषयीची माहिती मिळाल्यानंतर इतर रहिवासी संतापले आणि तिच्या अटकेची मागणी करू लागले. ही मोलकरीण अन्यही घरात काम करते. पण त्या घरात तिने असं काही केल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Post Bottom Ad

#

Pages