🚨 "स्पा" मसाज सेंटरच्या नावावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायवर कोंढवा पोलिसांची धडक कारवाई; सहा महिलांची सुटका.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 17, 2020

🚨 "स्पा" मसाज सेंटरच्या नावावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायवर कोंढवा पोलिसांची धडक कारवाई; सहा महिलांची सुटका..

🚨 "स्पा" मसाज सेंटरच्या नावावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायवर कोंढवा पोलिसांची धडक कारवाई; सहा महिलांची सुटका..

पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ.श्री.के.वेंकटेशम यांनी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर गांभीर्याने दखल घेऊन बंद करण्याचा आदेशानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनूसार कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत "स्पा सेंटर"च्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर एका महिन्याच्या कालावधीत ३ कारवाई करून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या मालकांचा पडदाफार्स करत त्यांच्या तावडीतून वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे.

पुणे कोंढवा येथे "ला बेला स्पा" सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी रविवारी (दि.१६) सांयकाळी ५.०० वा.सुमारास कोंढवा पोलिसांनी छापा टाकून ६ महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी "ला बेला स्पा"चा मालक स्वरूप रवी सबळ (वय २८, रा.साईनाथ नगर,वडगाव शेरी,पुणे), प्लॅटची मालकिन इंदु.व्ही.दुबे (रा.कॉढवा बु.पुणे) व प्लॅट भाडेतत्वावर घेणारी पुनम जहांगीर (रा.वडगाव शेरी पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी अशा प्रकारे केलेली कारवाई..
रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ०५.०० वा.सुमारास कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रगटीकरण शाखेमध्ये कर्तव्य बजाविणारे पोलीस नाईक श्री.सुशिल धिवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, सनश्री वुडस कॉम्प्लेक्स,आय.डी.बी.आय बँकेचे वरील बाजुस,क्लाऊड-९ रोड, एन.आय.बी.एम.रोड, कोंढवा
पुणे या ठिकाणील फ्लॅटमध्ये "ला बेला स्पा" सेंटरचे नावाखाली काहीजण वेश्या व्यवसायासाठी मुली ठेवुन त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय करीत असुन आपली उपजिवीका चालवित आहे, अशी बातमी प्राप्त होताच त्यानी ही बातमी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड व पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.महादेव कुंभार यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस नाईक श्री.सुशिल धिवार यांनी मिळालेल्या
बातमीचे आधारे श्री.गणेश धनावडे (रा.मार्केटयार्ड) यास बनावट गिऱ्हाईक बनवुन "ला बेला स्पा" सेंटरमध्ये पाठवून तेथील महिला वेश्या व्यवसाय करतात का ? अशी खात्रीशीर माहिती सांकेतिक भाषेत मिळताच कोंढवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री.कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक सौ.मनीषा गिरी, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवालदार श्री.जगताप, पोलीस नाईक श्री.सुशील धिवर, पोलीस नाईक श्री.अमोल फडतरे, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.बंडगर, चालक पोलीस नाईक श्री.पवार,पोलीस शिपाई श्री.किरण मोरे, पोलीस शिपाई श्री.विकास बांदल यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी "पंचा समक्ष" छापा टाकून "ला बेला स्पा"चा मालक स्वरूप रवी सबळ (वय २८, रा.साईनाथ नगर,वडगाव शेरी,पुणे) यास ताब्यात घेत त्याच्या तावडीतून वेश्या व्यवसाय करणाऱ्या सहा महिलांची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. "ला बेला स्पा"चा मालक स्वरूप सबळ याला कोंढवा पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असतात "ला बेला स्पा" सेंटरच्या प्लॅटची मालकिन इंदु व्ही. दुबे (रा.कॉढवा बु.पुणे) यांनी त्यांचा मालकीचा प्लॅट हा पुनम जहांगीर (रा.वडगाव शेरी पुणे) हिला भाडेतत्वावर दिला व तिने हा प्लॅट "ला बेला स्पा"चा मालक स्वरूप सबळ यास बेकायदेशीर कृत्य करण्याकरीता वापरास दिल्याने या तिघांनवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम कलम ३,४,५ प्रमाणे गु.र.न १६४/२०२० गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही,
श्री.सुनिल फलारी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या
सुचनांप्रमाणे मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर श्री.सुहास बावचे,
सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री.सुनिल कलगुटकर,
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड,
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री.कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक सौ.मनीषा गिरी, पोलीस हवालदार श्री.सुरेश भापकर, पोलीस हवालदार श्री.जगताप, पोलीस नाईक श्री.सुशिल धिवार, पोलीस नाईक श्री.अमोल फडतरे, पोलीस नाईक श्री.गणेश आगम, पोलीस शिपाई श्री.बंडगर, चालक पोलीस नाईक श्री.पवार, पोलीस शिपाई श्री.किरण मोरे, पोलीस शिपाई श्री.विकास बांदल यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages