🚨 पुणे शहर पोलीस दलात प्रथमच डीबी पथक महिलांचे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, February 9, 2020

🚨 पुणे शहर पोलीस दलात प्रथमच डीबी पथक महिलांचे..

✍🏻 भूषण गरुड

🚨 पुणे शहर पोलीस दलात प्रथमच डीबी पथक महिलांचे..
येरवडा पोलीस ठाण्यातील डीबीच्या तपास पथकाचे कारनामे पोलीस आयुक्तांच्या कानावरती पडल्याने डीबीचे तपास पथक बरखास्त करत सर्वांना धक्का देत आयुक्तांनी प्रथमच पुणे शहरात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये महिलांचे डीबी पथक तयार केले आहे. या तपास पथकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांच्याकडे देण्यात आली आहे.

पुणे शहरात 30 पोलीस ठाणे आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणार्‍या गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे आणि ते उघडकीस आणणे. तसेच, हद्दीतील सराईतांवर लक्ष ठेवणे यासोबतच फरार व पाहिजे आरोपींना पकडण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात डीबी पथक असते. या डीबीच्या पथकामध्ये सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक अधिकारी आणि कर्मचारी असतात. ज्या पोलीस ठाण्यातील डीबी पथक सक्षम असते तेथील गुन्हेगारीही कमी असल्याचे म्हटले जाते. गुन्हे शाखेपेक्षा सरस कामगिरी काही डीबी पथक करतात. अशी काही उदाहरणे देखील आहेत. शहरातील 30 पोलीस ठाण्यांपैकी काही अशीच दबंग डीबी पथके आहेत.

तत्पुर्वी गेल्या काही महिन्यांपासून येरवडा पोलीस ठाणे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होते. कामसोडून भलतेच उद्दोग सुरू होते. गुन्हेगारांसोबतची उटबस, तोडपाणी हे सर्व कारनामे पोलीस आयुक्तांच्या कानावर गेल्यानंतर तातडीने आयुक्तांनी पुर्ण डीबी पथकच बरखास्त केले. डीबी पथक बरखास्त केल्यानंतर येरवडा पोलीसांना नवीन डीबी पथकात महिला अधिकारी व कर्मचारी नेमण्याच्या सूचना दिल्यानंतर येरवडा डीबी पथकात प्रथमच महिला राज आले आहे. या डीबी तपास पथकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, या डीबी तपास पथकामध्ये वंदना यादव, उर्मीला दौंन्डे, वनिता पाटील, शिवानी जगताप, निर्मला रासकर, सोनाली कांबळे, पल्लवी नरूटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

#

Pages