अंमलीपदार्थ विरोधीपथकाने 'कोकेन' बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास केली अटक; ३५,०२,७४०/- रुपयाचे कोकेन व इतर ऐवज जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 21, 2020

अंमलीपदार्थ विरोधीपथकाने 'कोकेन' बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास केली अटक; ३५,०२,७४०/- रुपयाचे कोकेन व इतर ऐवज जप्त..

अंमलीपदार्थ विरोधीपथकाने 'कोकेन' बाळगणाऱ्या नायजेरियन इसमास केली अटक; ३५,०२,७४०/- रुपयाचे कोकेन व इतर ऐवज जप्त..

पुणे शहराचे मा.पोलीस आयुक्त श्री.डॉ.वेंकटेशम यांनी अंमलीपदार्थ विक्री करणा-यांचे समूळ उच्चाटन करण्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शननुसार गुरुवार दि.२० रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री.हेमंत ढोले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे हांडेवाडी येथील कात्रज सासवड बायपास रोडवर सापळा नायजेरियन देशाचा नागरीकाला अटक करत त्याच्याकडून ३४,०२,८००/- रूपये किंमतीचे ३४१ ग्रॅम २८० मिलीग्रॅम वजनाचे ‘कोकेन', ५०,०००/- रूपये किंमतीची दुचाकी तसेच रोख रूपये ३८,३४०/- असा व इतर असे एकुण ३५,०२,७४०/- रूपये किंमतीचा माल जप्त केला.

नायजेरियन देशाचा नागरीक व्हेलंन्टाईन ऊर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय २८, सध्या - रा.हर्षता कॉम्प्लेक्स, हांडेवाडी, पुणे. मुळ - रा. ईन्युगु, नायजेरिया) कोकेन बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.२४९/२०२० एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहराचे मा.पोलीस आयुक्त श्री.डॉ.वेंकटेशम, मा.पोलीस सहआयुक्त श्री.रविंद्र शिसवे, मा.गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उपायुक्त श्री.बच्चनसिंग यांनी अंमलीपदार्थ विक्री करणा-यांचे समूळ उच्चाटन करण्या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शननुसार व सूचनाप्रमाणे गुरुवार दि.२० रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक श्री.हेमंत ढोले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे, कात्रज सासवड बायपास रोडवरील, हांडेवाडी, हडपसर, पुणे येथील विद्या प्रमोदिनी नॅशनल स्कुलचे कमानी जवळ असणा-या सार्वजनिक रस्त्यावर पोलीस निरीक्षक श्री.विजय टिकोळे व त्यांच्या पथकाने दोन पंचांसह सापळा रचुन नायजेरियन देशाचा नागरीक व्हेलंन्टाईन ऊर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय २८, सध्या - रा.हर्षता कॉम्प्लेक्स, हांडेवाडी, पुणे. मुळ - रा. ईन्युगु, नायजेरिया) हा दुचाकीवरुन येत असताना त्यास पकडून, त्याचे ताब्यातून ३४,०२,८००/- रूपये किंमतीचे ३४१ ग्रॅम २८० मिलीग्रॅम वजनाचे ‘कोकेन', ५०,०००/- रूपये किंमतीची दुचाकी तसेच रोख रूपये ३८,३४०/- असा व इतर असे एकुण ३५,०२,७४०/- रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेला नायजेरियन इसम हा कोणताही परवाना नसताना अवैधरित्या पुणे शहरात वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमुद नायजेरियन इसमाविरूध्द हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.२४९/२०२० एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल करत नायजेरियन इसमास दि. २० रोजी अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्री.शेंडगे हे नायजेरियन आरोपीच्या विरूध्द यापुर्वी अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराबाबत गुन्हे दाखल आहेत काय तसेच त्याचे अंमली पदार्थाचे खरेदी विक्रीच्या अनंषगांने तो कोणा कोणाचे संपर्कात आहे. याबाबत पुढील तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ही,
मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.विजय टिकोळे, पोलीस उप-निरीक्षक श्री.हेमंत ढोले, पोलीस कर्मचारी श्री.शिंदे, श्री.काकडे, श्री.जोशी, श्री.दिवेकर, श्री.शिर्के, श्री.साळवी, श्री.साबळे, श्री.महेंद्र पवार, श्री.राहुल जोशी, श्री.शिवाजी राहीगुडे, श्री.अमित छडीदार, श्री.योगेश मोहिते यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages