💌 खास पुणेरी शैलीत टोमणा मारत पुणे पोलिसांनी "व्हॅलेंटाईन डे"च्या दिल्या शुभेच्छा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 14, 2020

💌 खास पुणेरी शैलीत टोमणा मारत पुणे पोलिसांनी "व्हॅलेंटाईन डे"च्या दिल्या शुभेच्छा..

💌 खास पुणेरी शैलीत टोमणा मारत पुणे पोलिसांनी "व्हॅलेंटाईन डे"च्या दिल्या शुभेच्छा..

पुणे पोलीसांनी आपली कल्पकता दाखवत देशातील नागरिक आणि प्रेमी युगुलांना ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला खास संदेश, शुभेच्छा, वस्तू भेट देऊन अथवा प्रेमाची भावना व्यक्त करुन अनेक लोक व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. दरम्यान, हेच औचित्य साधत पुणे पोलिसांनी मात्र खास ट्विट करत 'व्हॅलेंटाइन डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” असे पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आपण आज माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जगात वावरत आहोत. त्यातच आपली बरीच खाजगी माहिती इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपलब्ध असते. अशा वेळी आपली सुरक्षा ध्यानात घेऊन सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने कितीही प्रेमाने आपला पासवर्ड कितीही प्रेमाने मागितला तरी, तो तुम्ही त्या व्यक्तीला देऊन नका. म्हणूनच “प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही” असा खास पुणेरी शैलीत टोमणा मारत पुणे पोलिसांनी व्हॅलेंटाईन शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे पोलीस ट्विट
"प्रेम शेअर करा, पासवर्ड नाही"
#ValentinesDay2020
— PUNE POLICE (@PuneCityPolice) February 14, 2020
No terms & conditions on the day of love sir! See you at 5 PM. DM your contact details if coming #ValentinesDay2020 #BeOurValentinePune
— PUNE POLICE (@PuneCityPolice) February 14, 2020

दरम्यान, पुणे पोलिसांनी दिलेल्या शुभेच्छा नेटीझन्सना चांगल्याच आवडल्या आहेत. अनेकांनी पुणे पोलिसांच्या ट्विटला रिट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, पुणे पोलिसांचे हे ट्विट लाईक आणि शेअरही केले आहे. खास करुन पुणे पोलिसांचा संदेश तरुणाईला भलताच आवडला आहे. अनेक युजर्सनी पुणे पोलिसांनाही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्आ आहेत.

Post Bottom Ad

#

Pages