💧"पाण्याच्या प्रश्नावर" उंड्रीकरांचा टाहो; दिला आंदोनाचा इशारा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 13, 2020

💧"पाण्याच्या प्रश्नावर" उंड्रीकरांचा टाहो; दिला आंदोनाचा इशारा..

💧"पाण्याच्या प्रश्नावर" उंड्रीकरांचा टाहोदिला आंदोनाचा इशारा..

💧पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण झाल्यानंतर उंड्री गाववासीयांना पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत असल्याने उंड्रीकरांनी आक्रमक भुमिका घेत उपअभियंता श्री.सुनील अहिरे यांना पाणी प्रश्न सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले.

💧पुर्वी छोट्याशा असणाऱ्या उंड्री गावचा विकास झपाट्याने वाढत असताना एक वर्षापूर्वी उंड्री हे गाव महापालिकेत सामावून घेण्यात आले. आत्ताची लोकसंख्या पहाता महापालिकेच्या वतीने उंड्रीकरांना होणारा पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. ३ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या फक्त गावठाण भागात रोज सरासरी १० पाण्याचे टँकर महापालिकेच्या वतीने देण्यात येत आहेत तर विकास होत असलेल्या भागात इमारतींमध्ये साधारण २० टँकर पुरविले जात आहेत. त्यामुळे सरासरी २५००० लोकसंख्या असलेल्या भागात पुरविले जाणारे पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे मत उंड्रीतील समाजसेवक श्री.राजेंद्र भिंताडे यांनी निवेदन देताना व्यक्त केले.

💧पाण्याच्या प्रश्नावर उंड्री गाववासीयांनी अहिरे यांची भेट घेत पाण्याबाबतची समस्या सांगत पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत पालिकेकडून जादा पाण्याच्या टँकरची गावात व परिसरातील इमारती मध्ये मागणी केली आहे. यावेळी उपअभियंता श्री.अहिरे यांनी पाणीपुरवठा करण्याच्या कामांची सविस्तर माहिती गाववासीयाना दिली आणि खडी मशीन चौक ते उंड्री चौक या मुख्य पाइपलाइन खर्चा संदर्भात अर्थसंकल्पात अठरा कोटींची मागणी केली आहे. ग्रामपंचायत असताना गावचा विकास होताना इमारतींना पाण्याच्या लाईन देण्यात आल्या असत्या तर पाणी पुरवठा जलद गतीने करणे सोपे झाले असते असेही यावेळी सांगण्यात आले.

💧पाणी प्रश्नावर लवकारत लवकर तोडगा न निघाल्यास व महानगरपालिकेकडून जलवाहिनीच्या कामांना विलंब होत असल्यास भविष्यात पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात उंड्री रहिवाशांकडून आंदोलन केले जाईल असे यावेळी उंड्री वासीयांकडून सांगण्यात आले.

💧पाणी प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी समाजसेवक श्री.राजेंद्र भिंताडे, उंड्री रहिवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्री.अश्विन खिलारे, सौ.स्वाती टकले, सौ.जयश्री पुणेकर, श्री.दादासो कड, श्री.अविनाश टकले, श्री.ओंकार होले, श्री.हनुमंत घुले व पाटील उपस्थित होते.

Post Bottom Ad

#

Pages