😱 धक्कादायक..पुण्यात हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला चोरी करतांना अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 10, 2020

😱 धक्कादायक..पुण्यात हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला चोरी करतांना अटक..

✍🏻 भूषण गरुड

😱 धक्कादायक..पुण्यात हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीला चोरी करतांना अटक..
पुण्यात हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला सोन्याच्या दोन अंगठ्या चोरताना अटक करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे स्नेहलता पाटील असे आहे. एका हिंदी चित्रपटातील अभिनेत्रीलाच चोरीच्या आरोपात रंगेहाथ पकडल्याने पुण्यात एकच खळबळ माजली असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिला अटक केली आहे.

सोन्याच्या दोन अंगठ्या चोरणारी अभिनेत्री स्नेहलता पाटीलने या आधी अनेक हिंदी चित्रपटात कामं केली आहेत. या आधी अनेकवेळा सोन्याच्या दुकानात अशा घटना घडल्या आहेत. मात्र एका अभिनेत्रीनेच असा प्रकार केल्यामुळे या प्रकरणाची पुणे शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
अभिनेत्री स्नेहलता पाटील पुण्यातील कॅम्प परिसरात क्लोअर प्लाझा मॉलमध्ये एका ज्वेलरीच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने गेली. त्यावेळी तिने सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिला अटक केली. सीसीटीव्हीत आरोपी अभिनेत्री स्नेहलता पाटील दुकानदाराशी अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलताना दिसत आहे. ती दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या दाखवण्यास सांगत. दुकानदार अंगठ्या दाखवण्यात गुंग असतांनाच आरोपी अभिनेत्री चलाखीने सोन्याच्या दोन अंगठ्या चोरताना दिसत आहे. तिला सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages