😱 पुण्यात "दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो" असा जाब विचरत एका अल्पवयीन तरुणावर केला प्राणघातक हल्ला.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, February 5, 2020

😱 पुण्यात "दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो" असा जाब विचरत एका अल्पवयीन तरुणावर केला प्राणघातक हल्ला..

😱 पुण्यात "दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो" असा जाब विचरत एका अल्पवयीन तरुणावर केला प्राणघातक हल्ला..

पुणे शहरात "दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो" असा जाब विचरत एका गुंडांच्या टोळक्याने अप्पर इंदिरानगरमध्ये सोमवारी रात्री 8:30 वाजता सुमारास एका 17 वर्षीय तरुणावर धारधर हत्याराने प्राणघातक हल्लाकरुन गंभीर जखमी करत तेथे जमलेल्या नागरीकांना हत्यार दाखवून “कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या त्याचे तुकडे तुकडेच करतो" असे म्हणुन दहशत निर्माण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणाने फिर्याद दिली आहे.

अल्पवयीन फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी व परिसरातील नागरिकांना धमकावत दहशत निर्माण करणारे आरोपी
१) सनी जाधव (रा. चैत्रबण वसाहत,बिबवेवाडी,पुणे)
२) काळया गाडे (रा.चैत्रबण वसाहत,बिबवेवाडी,पुणे)
३) बाळया गाडे (रा.चैत्रबण वसाहत,बिबवेवाडी,पुणे)
४) सनी शिंदे (अप्पर ओटा,बिबवेवाडी,पुणे)
५) कुंदन शिंदे (रा.अप्पर ओटा,बिबवेवाडी,पुणे)
६) बाब्या पंधेकर (रा.अप्पर ओटा,बिबवेवाडी,पुणे) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील फरार आरोपीचां बिबवेवाडी पोलीस कसून शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
17 वर्षीय फिर्यादी हा त्याच्या मित्राच्या वाढदिवसासाठी सोमवारी रात्री 8:30 वाजता जात असतांना अप्पर इंदिरानगर येथील शेवटचा बसस्टॉपजवळ तोंडओळख असलेल्या गुंडांच्या एका टोळक्याने फिर्यादीला अडवत ‘‘अतुल जाधव, रणजित सांवत यांच्याबरोबर तु का राहतो. थांब तुला खल्लासच करतो’’ अशी धमकी देऊन सनी शिंदे व बाव्या पंधेकर याने त्यांच्याकडील शस्त्राने फिर्यादीवर वार करुन त्याला जखमी केले. फिर्यादी याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. भर रस्त्यात सुरु असलेला हा प्रकार पाहून लोक जमा झाले. तेव्हा तेथे जमलेल्या नागरिकांना हत्यार दाखवून ‘‘कोणाच्या अंगात दम असेल त्यांनी पुढे या त्यांचे तुकडे तुकडेच करतो’’, अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. त्यामुळे लोकांनी पुढे येण्याचे धाडस केले नाही. गुंड पळून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीला उपचारासाठी नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या 17 वर्षीय तरुणाने या घटनेप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून बिबवेवाडी पोलीस फरार आरोपीचा कसून शोध घेत आहे.

दरम्यान, घटनेनंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.मुरलीधर खोकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.के.बी.पावसे घटनास्थळी दाखल होत तपासाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.अतुल थोरात करीत आहेत.

Post Bottom Ad

#

Pages