पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांना मिळालं मोठं यश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 18, 2020

पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांना मिळालं मोठं यश..


🚨 पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांना मिळालं मोठं यश..

ऑगस्ट 2018 रोजी सायबर चोरट्यांनी पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम सर्व्हर सायबर हल्ला केला होता त्यात सुमारे 94 कोटी 42 लाख रुपये लंपास केले होते. यातील 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुण्याचा सायबर पोलिसांना यश मिळालं आहे. अशा प्रकारे सायबर हल्ल्यात चोरीला गेलेली रक्कम परदेशातून परत मिळवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर सिस्टिमची फसवणूक करुन पैसे काढण्यात आल्यानंतर हे पैसे 28 देशांमधील एटीएममधून काढले गेल्याचं आणि त्यापैकी अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे अटक आरोपींचा कोणत्यारी आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचे समोर येत आहे.

असे प्रकारे वर्ग केले रुपये..

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस बॅंकेचे मुख्यालय आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सायबर चोरट्यांनी याच मुख्यालयातील बँकेच्या एटीएम सर्व्हर मालवेअर हल्ला चढवला होता. त्याद्वारे त्यांनी सुमारे 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम लुटली होती. तब्बल 26 देशांतील बँकांच्या एटीएममधून हे पैसे काढण्यात आले होते. तर हॉंगकॉंगमधील हेनसेंग बॅंकेत 13 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आली होती. या घटनेमुळे तेव्हा संपूर्ण भारतात एकच खळबळ माजली होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त आर्थिक गुन्हे संभाजी कदम यांनी दिली आहे.

असे काढले रूपये..

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम सर्व्हर वर सायबर हल्ला करत तब्बल 94 करोड 42 लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता. 11 ऑगस्ट 2018 रोजी ही घटना घडली होती. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई करत आहे. चोरट्यांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे क्लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचे तपासात समोर आले होतं. एकूण रक्कम 94 कोटी रुपयांची आहे. मात्र अटक आरोपींनी 89 लाख रुपये कोल्हापुरमधील वेगवेगळ्या एटीएममधून कार्ड क्लोन करुन काढले आहेत. बाकी पैसे कोणी आणि कसे काढले याबात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

Post Bottom Ad

#

Pages