बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख व टोळी सदस्य दोन वर्षासाठी तडीपार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 20, 2020

बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख व टोळी सदस्य दोन वर्षासाठी तडीपार..

बिबवेवाडीतील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख व टोळी सदस्य दोन वर्षासाठी तडीपार..
बिबवेवाडी आणि परिसरात गुन्हेगारीचा उच्छाद मांडलेला पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख व टोळी सदस्य याना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त श्री.सुहास बावचे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार १) टोळी प्रमुख - रितेश विजय कोंढरे (वय २२, रा.लोअर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे), २) टोळी सदस्य - अनिकेत उर्फ आंडया विजय कोंढरे (वय २०, रा.लोअर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे) अशी ताडीपारीची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
बिबवेवाडी पोलीस ठाणेचे रेकॉर्डवरील गुन्हेगार १) टोळी प्रमुख - रितेश विजय कोंढरे (वय २२, रा.लोअर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे), २) टोळी सदस्य - अनिकेत उर्फ आंडया विजय कोंढरे (वय २०, रा.लोअर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दुखापत करणे, गाडयांची तोडफोड करुन जनमानसात दहशत पसरवणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे तडीपार प्रस्ताव मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ - ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ - ५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांनी नमुद आरोपाना त्यांच्या कार्यालयीन आदेश क्र.०४/२०२० दि.१९ फेब्रुवारी २०२० अन्वये कलम ५५ प्रमाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयाच्या हद्दीमधुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कारवाई,
मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ - ०५ पुणे शहर श्री.सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांचे सुचने नुसार पोलीस शिपाई श्री.रुपनर, पोलीस शिपाई श्री.शेडगे यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages