🚨 दीड वर्षापासून फरार असलेला आरोपीस पोलीसांनी केली अटक.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, February 11, 2020

🚨 दीड वर्षापासून फरार असलेला आरोपीस पोलीसांनी केली अटक..

🚨 दीड वर्षापासून फरार असलेला आरोपीस पोलीसांनी केली अटक..

भूषण गरुड : पुणे शहर सहकारनगर पोलिस स्टेशनच्या अभिलेखावरील फरार पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना दीड वर्षापासून फरार असलेल्या दोन आरोपींची माहिती प्राप्त होताच तपास पथकातील पोलिसांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे छापा टाकून अटक केली आहे. राहुल अनिल बिनावत दुसरा फरार पाहीजे असलेला आरोपी तेथून पळून गेल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी बादल राम मारवाडी कुंभार (वय ३५, रा.मेघस्पर्श सोसायटी,आंबेगाव खुर्द.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पोलीस उप-आयुक्त श्री.शिरीष सरदेशपांडे परिमंडळ २ यांनी आरोपींचा शोध घेन्याकामी आदेशित केल्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील फरार पाहीजे असलेल्या आरोपींचा तपास पथकातील पोलीस शोध घेत असतांना रविवार दि.०९ फेब्रुवारी २०२० रोजी दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपी दोन्ही पाहिजे आरोपी हे साईव्दारका सोसायटी, येवलेवाडी,कोंढवा येथील एका फ्लॅटमध्ये असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाताच तात्काळ ही माहिती मा.सहा.पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री.सर्जेराव बाबर, सहकारनगर पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार बिडवई यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.विजय पुराणिक, सहा.पोलीस निरीक्षक सुहास पाटील, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस हवलदार विजय मोरे, पोलीस नाईक भुजंग इंगळे, पोलीस नाईक मनोज निर्मळे, पोलीस शिपाई सचिन कुंदे, पोलीस शिपाई प्रदिप बेडीस्कर, महिला पोलीस हवल दार सुरेखा अनपट, महिला पोलीस नाईक वैशाली निकम यादव मिळालेल्या बातमीच्या आधारे साईब्दारका सोसयटीच्या बिल्डींगमध्ये पाहिजे असलेला आरोपी राहत असल्याची खात्री होताच सापळा रचून सदर फ्लॅटचा आतुन बंद असलेला दरवाजा वाजवला असता दरवाजा फरारी आरोपी बादल राम मारवाडी कुंभार याने उघडला असता त्याला पोलीस असल्याचे कळताच त्याने धक्का देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असताच त्यास ताब्यात घेत अटक केली आहे. यावेळी गुन्हयातील दुसरा आरोपी राहूल अनिल बिनावत हा पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.

सदर दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस
निरीक्षक गुन्हेशाखा श्री.विजय पुराणिक हे करीत आहेत.

सदर कारवाई,
मा.पोलीस उप-आयुक्त श्री.शिरीष सरदेशपांडे परिमंडळ २ पुणे शहर,
मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.सर्जेराव बाबर सो,स्वारगेट विभाग पुणे शहर,
सहकारनगर पोलीस स्टेशनचे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा श्री.विजय पुराणिक,
सहा.पोलीस निरीक्षक श्री.सुहास पाटील,
पोलीस उपनिरीक्षक श्री.गौरव देव,
पोलीस हवलदार श्री.विजय मोरे,
पोलीस नाईक श्री.भुजंग इंगळे,
पोलीस नाईक श्री.मनोज निर्मळे,
पोलीस शिपाई श्री.सचिन कुंदे,
पोलीस शिपाई श्री.प्रदिप बेडीस्कर,
महिला पोलीस हवलदार सुरेखा अनपट,
महिला पोलीस नाईक वैशाली निकम यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages