😱 तीन राजकीय वजनदार बडे बिल्डरांबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एक आघाडीचा अभिनेता आणि एका बड्या राजकीय नेत्यावर ईडीचा पंजा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 6, 2020

😱 तीन राजकीय वजनदार बडे बिल्डरांबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एक आघाडीचा अभिनेता आणि एका बड्या राजकीय नेत्यावर ईडीचा पंजा..

😱 तीन राजकीय वजनदार बडे बिल्डरांबरोबर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एक आघाडीचा अभिनेता आणि एका बड्या राजकीय नेत्यावर ईडीचा पंजा..

मुंबईसह देशभरात बांधकाम आणि निर्मिती व्यवसायाचे तीनतेरा वाजले असताना शहरातील तीन राजकीय वजनदार बडे बिल्डर अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) रडारवर आले असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. या बड्या बिल्डरांबरोबर मनी लॉड्रिंग करणारा आणि केंद्र सरकारच्या योजनांसाठी चंदेरी पडद्यावर ‘शिकवणी’ घेणारा एक आघाडीचा अभिनेता आणि तसेच एका बड्या राजकीय नेत्यावरही ईडीचा पंजा पडू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

ईडीच्या रडारवर असलेला पहिला बिल्डर :-
पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या लाखो खातेदारांना सुमारे सात हजारांहून अधिक कोटी रुपयांचा घोटाळा करून देशोधडीला लावणार्‍या एचडीआयएल कंपनीच्या तुरुंगात असलेल्या संचालकांनी अत्यंत धक्कादायक माहिती चौकशीमध्ये उघड केली आहे.त्यानुसार ईडीने वेगाने आपल्या कारवाईची सुत्रे हलवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील तीन बडे मासे जाळ्यात आले तर संपूर्ण बांधकाम क्षेत्र हादरुन जाणार आहे. यापैकीचा एक दाक्षिणात्य बडा वजनदार बिल्डर शहरातील मोठेमोठे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात पारंगत आहे. बांधकामनिर्मिती बरोबरच हॉटेल, खाण, विमानसेवा आणि प्रसिध्दी माध्यमे अशा व्यवसायाच्या चौफेर मुशाफिरीसाठी प्रसिद्ध हा बिल्डर अनेक राजकारण्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो.

ईडीच्या रडारवर असलेला दुसर्‍या बिल्डर :-
रडारवर असलेल्या दुसर्‍या बिल्डरचे कार्यालय पूर्व उपनगरात असून हा उत्तर भारतीय बिल्डरही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विकास क्षेत्रात दबदबा निर्माण करून आहे. घाटकोपर, कुर्ला, सायन, भोईवाडा, सातरस्ता, वरळी, मालाड आणि शिवडी अशा मोक्याच्या ठिकाणी या बिल्डरने राजकीय वरदहस्ताने आपले साम्राज्य निर्माण करताना प्रशासकीय अधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांना आपली बटिक केली आहे.

ईडीच्या रडारवर असलेला तिसरा बिल्डर :-
तिसरा बिल्डर पंजाबी असून एका मॉडेल आणि अभिनेत्रीचा पती आहे. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलचा मालक असलेला हा बिल्डर आलिशान घरांच्या टोलेजंग इमारती बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका प्रथितयश कंपनीला सोबत घेऊन दर्जेदार बांधकामांवर स्वत:चा ठसा उमटवला आहे. पश्चिम उपनगरातील एका पॉश मॉलची मालकीही या बिल्डरकडे आहे.

तो बॉलिवूड अभिनेता कोण ?
या बिल्डरने बॉलिवूडमधील आघाडीचा ‘माचो मॅन’अभिनेत्याशी हातमिळवणी करत सुमारे चार हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केली असल्याची माहिती ईडीच्या अधिकार्‍यांच्या हाती लागली आहे. हा अभिनेता एका मोठ्या सुपरस्टारचा जावई असून केंद्र सरकारच्या योजनांवर एकापाठोपाठ एक धडाक्याने चित्रपट बनवणे ही त्याची खासियत आहे.

वाधवानने घेतले राजकीय नेत्याचे नाव
बांधकाम, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात ‘ट्रिपल धमाका’ करून मायानगरी हादरवून टाकणारी ही माहिती एचडीआयएलचा तुरुंगात असलेला संचालक राकेश कुमार वाधवान याने तपशीलवारपणे चौकशीत अधिकार्‍यांना दिली आहे. राकेश कुमार वाधवान हा सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या एका नेत्याचा खूप घनिष्ट मित्र आणि व्यवसाय सहकारी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वाधवान याने या नेत्याचे नावही घेतल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे.

Post Bottom Ad

#

Pages