अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक; एक अग्निशस्त्र व चार जिवंत काडतुसे जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, February 21, 2020

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक; एक अग्निशस्त्र व चार जिवंत काडतुसे जप्त..

अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी केली अटक; एक अग्निशस्त्रचार जिवंत काडतुसे जप्त..

पुणे शहरात बुधवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या कुख्यात दत्ता माने टोळीतील हस्तकाला भारती पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक अग्निशस्त्र व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अग्निशस्त्र बाळगणारा सराईत गुन्हेगार सागर कृष्णा जाधव (वय ३०, रा.सरंगमचाळ,अप्पर बिबवेवाडी,पुणे) यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करत त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारती विदयापीठ पोलीस स्टेशनच्या हददीत कायदा-सुव्यवस्था राखणेकामी आदेशान्वये पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करित असताना तपास पथकातील पोलीस कर्मचारी श्री.अभिजीत जाधवश्री.महेश मंडलीक यांना त्यांच्या बातमीदाराकडून डॉल्फीन चौकात, बसस्टॉपच्या जवळ एक हिरव्या रंगाचा टि शर्ट घातलेला संशयित इसम अग्निशस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळताच ही माहिती भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.विष्णु ताम्हाणे यांना कळवत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक श्री.महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्री.कृष्णा बढे, श्री.अभिजीत जाधव, श्री.गणेश चिचंकर, श्री.महेश मंडलीक, श्री.अभिजीत रत्नपारखी, श्री.कुंदन शिदे, श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल तांबे, श्री.सचिन पवार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याठिकाणी सापळा रचून अग्निशस्त्र बाळगणारा आरोपी सागर कृष्णा जाधव (वय ३०, रा.सरंगमचाळ,अप्पर बिबवेवाडी,पुणे) यास ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पॅन्टच्या आत खोचलेले एक अग्निशस्त्र व पॅन्टच्या डाव्या खिशात चार जिवंत काडतुस मिळुन येत ते जप्त करत त्याची सखोल चौकशी केली असता सागर जाधव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द सहकारनगर पोलीस ठाणे येथे खुनाचा, कोढवा पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न केल्याचा, व भारती विदयापीठ पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा असे ३ गुन्हे दाखल आहे. तसेच तो बालाजीनगर येथील दत्ता माने गॅगचा सदस्य असल्याची माहिती मिळताच त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) व मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 अन्वये प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

सदर कामगिरी,
मा.अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ.श्री.संजय शिंदे, मा.परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त श्री.शिरीष सरदेशपांडे, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री.सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री.विष्णु ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री.भुषण कोते, पोलीस उपनिरीक्षक श्री.महेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्री.कृष्णा बढे, श्री.अभिजीत जाधव, श्री.गणेश चिचंकर, श्री.महेश मंडलीक, श्री.अभिजीत रत्नपारखी, श्री.कुंदन शिदे, श्री.सर्फराज देशमुख, श्री.राहुल तांबे, श्री.सचिन पवार यांच्या पथकाने केली आहे.
 

Post Bottom Ad

#

Pages