💰 Budget 2020 - 2021 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 1, 2020

💰 Budget 2020 - 2021

💸 अर्थसंकल्प 2020 - 2021

💰 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसऱ्यांदा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठी आर्थिक तरतूद केल्याचे दिसून आले आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यावर प्रामुख्याने भर दिसून आला आहे.

📣 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे बजेट भाषण :-
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट भाषण केले आहे. यापूर्वी 2003 मध्ये जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांचे भाषण सुरू झाले जे अडीच तासापेक्षा जास्त चालले.

🎯 ही आहेत आव्हाने :- देशावर असलेलं मंदीचं सावट तसेच गेल्या 10 वर्षांतील घटलेला जीडीपी दर, वाढती बेरोजगारी ही प्रमुख आव्हाने आजच्या अर्थसंकल्पापुढे असणार आहेत.

🤔 याबाबत उत्सुकता :-
◾ इनकम टॅक्समध्ये होणारे बदल
◾ ग्रामीण, कृषी क्षेत्रासाठीच्या योजना
◾ रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय मिळणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प :-
जीएसटी या एकल कर प्रणालीमुळे देशाला फायदा.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यास सरकारला यश.
27 कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेबाहेर काढण्यात यश.
तरुणांना उद्योगनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन.
बँकांची स्थिती मजबूत झाली, 60 लाख नवीन करदाते तयार झाले.
◾ भारत जगातील 5 वी मोठी अर्थ व्यवस्था.
◾ आरोग्य शिक्षण, रोजगारावर सरकारचा भर.
◾ अर्थसंकल्पात गरिबांसाठी खास योजना.
◾ देशातल्या प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहचविण्यात यश.
विविध प्रकारच्या पेन्शन योजना लवकरच नागरिकांपर्यंत पोहचवणार.

💥 पर्यटन व सांस्कृतिक :-
नॅशनल गॅस ग्रीड 27 हजार किलोमीटर पर्यंत वाढविणार, अक्षय ऊर्जेसाठी 22 हजार कोटींची तरतूद.
घरात स्मार्ट मीटर बसविणार, 3 वर्षात जुने मीटर बदलणार.
भारत नेट योजनेसाठी 6 हजार कोटींची तरतूद, डेटा सेंटर उभारणार, सायबर सुरक्षेवर भर.
शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढले, बेटी बचाव बेटी पढाओला उत्स्फूर्त प्रतिसाद.
पोषण आहारासाठी 35 हजार कोटींची तरतूद.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी 9 हजार 500 कोटींची तरतूद.
अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीसाठी 85 हजार कोटींची तरतूद.
पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद, देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार.
झारखंडमध्ये आदिवासी विकास म्युझिअम उभारणार, सांस्कृतिक विभागासाठी 3 हजार 150 कोटींची तरतूद.
स्वच्छ हवेसाठी 4 हजार 400 कोटींची तरतूद, कार्बन उत्सर्जन करणारे थर्मल प्लँट बंद करणार.

💥 आरोग्य आणि शिक्षण :-
रोजगार निर्मितीवर सरकारचा भर, नव्या शिक्षण धोरणाची लवकरच घोषणा
2025 पर्यंत देशातून टीबी हद्दपार करण्याचा संकल्प, इंद्रधनुष्य योजनेत नवीन 12 आजारांचा समावेश करणार
ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर, ऑनलाईन डिग्री प्रोग्रॅम सुरु करणार, शिक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची गरज, या क्षेत्रात एफडीआय सुरु करणार
जलजीवन मिशन साठी 3.6 लाख कोटींची तरतूद,  स्थानिक स्वराज्य संस्थानीं नव्या अभियंत्यांना संधी द्यावी.
राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचा प्रस्ताव, तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करणार.
डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नव्या संस्था उभारणार, उच्च शिक्षणासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार.
नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची निर्मिती करणार, स्किल इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद.
99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद.

💥 कृषी क्षेत्रासाठी तरतूद :-
विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर.
अन्नदाता ऊर्जादाता होण्यासाठी प्रयत्न करणार, शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर व्हावा म्हणून प्रयत्नशील.
सेंद्रिय खते वापरण्यासाठी प्रोत्साहन, पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्हयांसाठी विशेष काम करणार.
20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येणार, 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ.
शेतकी मालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी किसान रेल्वे चालविली जाणार.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार, दूध उत्पादकांसाठी खास योजना, 2025 पर्यंत दुग्ध उपन्न दुप्पट करू.
गाव स्तरावर गोदामांची निर्मिती केली जाणार, शेतकऱ्यांसाठी 16 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद.
जिल्हास्तरावर फळबाग विकासासाठी प्रोत्साहन देणार, शेती आणि ग्राम विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद.
मत्स्य उत्पादन 200 लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट, किनारपट्टीतील तरुणांसाठी सागरमित्र योजना राबविणार.
112 जिल्ह्यांमध्ये आयुष्यमान रुग्णालयांची निर्मिती करणार.

💥 बँकिंग व कर :-
बँकांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार, नॉन गाझीटेड पोस्टसाठी नॅशनल रिक्रूमेन्ट एजन्सीची निर्मिती करणार.
जी -20 परिषदेच्या यजमान पदासाठी 100 कोटींची तरतूद.
बँकेतील 5 लाखांच्या ठेवीवर विमा सुरक्षा, बँकांसाठी 3 लाख 50 हजार कोटींचा निधी.
पेन्शनसाठी ट्रस्ट तयार करणार, एलआयसीमधील भागीदारी विकण्याचा सरकारचा प्रस्ताव.
2.50 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही कर लागणार नाही, अडीच ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर भरावा लागणार.
5 ते 7 .50 लाखांपर्यंतची कामे असणाऱ्यांसाठी 10 टक्के कर भरावा लागणार.
7 .50 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता 15 टक्के कर भरावा लागणार. 
10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर भरावा लागणार.
12 .5 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर भरावा लागणार.
15 लाखांच्या वरील उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागणार.

Post Bottom Ad

#

Pages