👌Young man trapped in a house locked in a flat door in Pune Police rescued them safely with the help of fire brigade.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, February 3, 2020

👌Young man trapped in a house locked in a flat door in Pune Police rescued them safely with the help of fire brigade..

👌पुण्यात फ्लॅटचा दरवाजा लॉक होऊन घरात अडकलेल्या इसमास पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने केली सुखरुप सुटका..
बिबवेवाडी परिसरातील रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०७.३० वा.सुमारास मेघस्पर्श सोसायटीमध्ये फ्लॅटच्या दरवाजाचे स्लॅच लॉक होऊन घरात अडकलेल्या ४२ वर्षीय इसमाची पुणे शहर पोलिस नियंत्रण कक्षातून बिबवेवाडी पोलिसांना माहिती मिळताच अप्पर बीटमार्शल पोलीस शिपाई राहुल कोठावळे, सी.आर.मोबाईलवरील पोलीस शिपाई दत्ता केंद्रे व सहा.पोलीस उप-निरीक्षक एन.एन.जगताप यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सुखरूप सुटका केल्याची घटना घडली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होते आहे.
दरवाजा लॉक होऊन घरात अडकलेले किशोर गिरधारीलाल तिलोखाले (वय ४२, राहणार. मेघस्पर्श सोसायटी, बिबवेवाडी,पुणे) यांची बिबवेवाडी पोलिसांनी घराचा दरवाजाचे स्लॅच लॉक तोडुन सुखरूप सुटका केली आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार,
रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०७.३० वा.सुमारास नियंत्रण कक्ष येथुन कॉल प्राप्त झाला की, किशोर गिरधारीलाल तिलोखाले (वय ४२, राहणार. मेघस्पर्श सोसायटी, बिबवेवाडी,पुणे) हे त्यांच्या राहते घरात असतांना घराच्या दरवाजाचे स्लॅच लॉक झाल्याने घरामध्ये अडकले असल्याचा कॉल द्वारे माहिती मिळताच बिबवेवाडी अप्पर बीटमार्शल पोलीस शिपाई राहुल कोठावळे, सी.आर.मोबाईलवरील पोलीस शिपाई दत्ता केंद्रे व सहा.पोलीस उप-निरीक्षक श्री.एन.एन.जगताप यांनी तात्काळ प्राप्त झालेल्या ठिकाणी जावुन इसम किशोर गिरधारीलाल तिलोखाले (वय ४२) हे त्याचे राहते घरामध्ये अडकल्याचे समजताच बिबवेवाडी पोलीसांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. याघटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच बिबवेवाडी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सदर इसम किशोर तिलोखाले यांच्या गॅलेरीत जावुन अप्पर बीटमार्शल पोलीस शिपाई राहुल कोठावळे, सी.आर.मोबाईलवरील पोलीस शिपाई दत्ता केंद्रे व सहा.पोलीस उप-निरीक्षक श्री.एन.एन.जगताप यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे स्लॅच लॉक तोडुन किशोर तिलोखाले यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुखरूप सुटका झाल्याने किशोर तिलोखाले यांनी बिबवेवाडी पोलिसांचे व अग्निशमन दलाच्या जवानांचे खूप खूप आभार मानले आहेत. तसेच समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
सदरचे कामगिरी,
बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक श्री.एन.एन.जगताप, अप्पर बीटमार्शल पोलीस शिपाई श्री.राहुल कोठावळे, सी.आर.मोबाईलवरील पोलीस शिपाई श्री.दत्ता केंद्रे व अग्निशमन दलाच्या जवानांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages