👌पुण्यात व्हॉट्स अॅपव्दारे पोलीसांनी हरवलेल्या 04 वर्षाच्या मुलीच्या पालकांचा एका तासाच्या आत शोध घेत मुलीला पालकांकडे केले सुखरुप सुपूर्द.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 7, 2020

👌पुण्यात व्हॉट्स अॅपव्दारे पोलीसांनी हरवलेल्या 04 वर्षाच्या मुलीच्या पालकांचा एका तासाच्या आत शोध घेत मुलीला पालकांकडे केले सुखरुप सुपूर्द..

👌 पुण्यात व्हॉट्स अॅपव्दारे पोलीसांनी हरवलेल्या 04 वर्षाच्या मुलीच्या पालकांचा एका तासाच्या आत शोध घेत मुलीला पालकांकडे केले सुखरुप सुपूर्द..

पुणे शहर बिबवेवाडी परिसरात 04 वर्षे वयाची मुलगी ही ओढयाच्या कडेला रडत रडत फिरत असल्याचे दोन अल्पवयीन मुलांना दिसताच मुलांनी 04 वर्षाची मुलीची विचारपूस केली असता मुलांना 04 वर्षाची मुलगी हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलीस बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. क्षणाचा विलंब न करता लागलीच पोलीस हवालदार चिप्पा यांनी 04 वर्षे वयाच्या मुलीचा फोटो इतर ग्रुपवर पाठवुन मुली बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास बिबवेवाडी पोलीस ठाणेस संपर्क करण्याचे आव्हान करताच हरवलेल्या मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून मुलीला ताब्यात घेतले.

सोशलमीडियाचा प्रभावी वापर करत असा घेतला हरवलेल्या मुलीच्या पालकांचा शोध..
शुक्रवार दि.06 मार्च 2020 रोजी दुपारी 03:00 वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले हर्षद कुंदन वीर (वय 16) व शिवाजी चंद्रकांत चिटमिल (वय 17, रा.ओढयाची चाळ,लोअर इंदिरा नगर,बिबवेवाडी,पुणे) यांनी अंदाजे 04 वर्षे वयाची मुलीला सोबत घेवुन बिबवेवाडी पोलीस ठाणेस येवुन कळविले की, 04 वर्षे वयाची मुलगी ही आम्हाला ओढयाच्या कडेला रडत रडत फिरत असल्याचे मिळुन आल्याने आम्ही तिला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव स्वामीनी सांगितले असुन तिला तिचा राहता पत्ता संगता येत नसल्याने आम्ही तिला पोलीस ठाणेस घेवुन आलो आहोत असे कळविल्याने लागलिच ठाणे अंमलदार म्हणुन  दिवसपाळी कर्तव्यास असलेले पोलीस हवालदार खंडाळे यांनी सदर मुलीचा फोटो काढुन तो तपास पथकातील पोलीस हवालदार चिप्पा यांच्या मोबाईलवर पाठवुन त्यांनी 04 वर्षे वयाच्या मुलीचा फोटो इतर ग्रुपवर पाठवुन मुली बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास बिबवेवाडी पोलीस ठाणेस संपर्क करण्याचे आव्हान करताच लागलीच बिबवेवाडी पोलीस ठाणेस इसम अभिजीत जयप्रकाश शेडगे (वय-32, रा.गेणश कृपा अर्पाटमेंट,पुण्याई नगर,धनकवडी,पुणे) यांचा फोन आला की, सदरची 04 वर्षे वयाची मुलगी ही त्यांची असल्याचे सांगितले. लागलीच त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाणेस बोलावुन सदर 04 वर्षाच्या मुली बाबत अधिक चौकशी करुन मुलीच्या वडिलांची खात्री पटवून सदर मुलीस सुखरुप वडिलांच्या ताब्यात दिले.
मुलगी सुखरुप मिळाल्याने मुलीच्या पालकांनी बिबवेवाडी पोलीसांचे व हर्षद कुंदन वीर, शिवाजी चंद्रकांत चिटमिल या दोन अल्पवयीन मुलांचे आभार व्यक्त केले आहे.

सदरची कामगिरी,
बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनानुसार व सुचनेप्रमाणे पोलीस हवालदार चिप्पा ,पोलीस हवालदार खंडाळे , महिला पोलीस शिपाई कुतवळ , महिला पोलीस शिपाई मोटे यांनी केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages