🚨 पुण्यात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या इसमास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक; 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 17, 2020

🚨 पुण्यात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या इसमास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक; 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त..


🚨 पुण्यात बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या इसमास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक; 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त..

पुणे शहर सिहंगड रोड येथील वडगाव धायरीत एकजण पिस्तुल बाळगत उभा असल्याची गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एका इसमास अटक केली आहे. त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुस जप्त केली आहेत. याबाबत सिहंगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा इसम नवनाथ उर्फ बापू बाबासाहेब शेलार (वय 34, रा. नांदोशी, ता. हवेली) यास गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेत त्याच्यावर सिहंगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पुणे शहरात गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी तसेच पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती घेत असतांना पोलिस नाईक श्री. संदीप साबळे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव धायरी भागात एकजण उभा असून त्याच्याजवळ पिस्तुल आहे. ह्या मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र मोहिते , पोलिस उपनिरीक्षक श्री. महाडीक , पोलिस नाईक श्री. संदीप साबळे व पथकातील कर्मचारी यांनी त्याठिकाणी सापळा रचून बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा इसम नवनाथ उर्फ बापू बाबासाहेब शेलार (वय 34, रा. नांदोशी, ता. हवेली) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व 2 काडतुसे मिळून आली असून त्याच्यावर सिहंगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा नवनाथ उर्फ बापू बाबासाहेब शेलार याने पिस्तुल कुठून आणि कशासाठी आणले आहे याबाबतचा अधिक तपास गुन्हे शाखा करीत आहेत.

सदरची कामगिरी,
गुन्हे शाखा खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राजेंद्र मोहिते , पोलिस उपनिरीक्षक श्री. महाडीक , पोलिस नाईक श्री. संदीप साबळे व पथकातील कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे.

Post Bottom Ad

#

Pages