राशीभविष्य :- 1 मार्च 2020 - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 1, 2020

राशीभविष्य :- 1 मार्च 2020

राशीभविष्य :- 1 मार्च 2020

मेष : आज मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. दाम्पत्यांमध्ये आनंद प्राप्त होईल.आपली पत्नी आणि मुलांना वेळ द्या. जवळच्या प्रेमळ व्यक्तिशी भेट होण्याची शक्यता आहे.

वृषभ : सुरूवातीला कामात काही अडचणी येतील. पैशांच्या नियमित व्यवहारामुळे चिंता करण्याची गरज नाही. नोकरीत सहकाऱ्यांची चांगली साथ मिळू शकते. मित्रांना भेटून खूप प्रसन्नता वाटेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन : आज घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. तुम्हाला कामात समाधान मिळेल. महिलांकडूनआदर मिळू शकेल. आईशी नातं चांगलं राहील. निराश होऊ नका.


कर्क : व्यापारी आणि विरोधकांशी स्पर्धा करू नका. कोणत्याही कामात यश मिळेल. आजारी व्यक्तींच्या तब्बेतीत सुधारणा होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. सासरवाडीतून चांगली बातमी मिळेल.
सिंह : आजचा दिवस शुभ आहे. नवीन कामाची सुरूवात आज करू शकता. आरोग्य निरोगी राहील. मन स्थिर राहील. प्रवास सुखाचा होईल. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे अनुकूल वातावरण राहील. कामा-धंद्यात प्रगती होईल.

कन्या : अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून चांगले आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. तिर्थयात्रेसाठी बाहेर फिरायला जाऊ शकता. नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल.

तूळ : आज यश निश्चित मिळेल. पैसे येण्याची शक्यता आहे. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकं आज नक्की यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज हनुमानाची उपासना करा.

वृश्चिक : राजकारण करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीशील आहे. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील लोकांना कार्यांत आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील.

धनु : तुमच्यात समर्पणाची भावना आहे. तुमचे विचार उदार मतवादी असे आहेत. आपल्या सहकाऱ्यांपासून सावधानता बाळगा. काही प्रमाणात मानसिक अशांतता जाणवेल. कामामध्ये काही बदल होऊ शकतात.

मकर : आज परमेश्वराचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळू शकते. व्यवसायिक क्षेत्रात प्रभाव निर्माण करू शकता.
कुंभ : न्यायालयीन कामांसाठी अनुकूल वातावरण असेल. मनात शंका आणि अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे शारीरिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. व्यवहारात संयम ठेवा. आज तुम्ही खूप उत्साहित असाल. आज खर्च वाढतील आणि गैरसमज होण्यापासून सावध रहा.
मीन : आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांचे व्यवहार करताना किंवा भांडवलाची गुंतवणूक करताना काळजी घ्या. कोर्टाची कामे काळजीपूर्वक हाताळा. खर्चाचे प्रमाण जास्त असेल.

Post Bottom Ad

#

Pages