🚷 साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू .. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 19, 2020

🚷 साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू ..


🚷 साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू ..

कोरोना वायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि पुणेकरांच्या आरोग्यासाठी प्रशासनाकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यासोबतच शाळा, महाविद्यालये, गार्डन, मॉल, मोठ्या बाजारपेठा, मदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू नये म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू राहणार आहेत. अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. पुण्यात फुल आणि भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय बाजारातील संघटनांनी घेतला आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस बाजारपेठ बंद राहणार आहे. देशाता आतापर्यंत 170 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात 44 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण हे पुण्यात आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने केले हे मोठे बदल तुम्हाला माहीत आहेत का ?..
1) राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील.
2) रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
3) मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील.
4) दुकानांच्या वेळा ठरवणार- शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल.
5) साधनसामुग्रीची उपलब्धता- दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.

Post Bottom Ad

#

Pages