🏏 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 5, 2020

🏏 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये..

🏏 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये..

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. गुरुवारी टीम इंडिया व बलाढ्या इंग्लंडमध्ये होणारा सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणतालिकेत सर्वाधिक गुण असल्याने टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या फायनस मध्ये प्रवेश केला आहे.

MATCH ABANDONED ☔

For the first time in their history, India have qualified for the Women’s #T20WorldCup final pic.twitter.com/88DHzqTbnK

— T20 World Cup (@T20WorldCup) March 5, 2020

‘अ’ गटात अव्वल असलेला हिंदुस्थान आणि ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंड यांच्यात पहिली उपांत्य लढत होणार होती. विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या टीम इंडियाला अद्याप एकदाही इंग्लंडला हरवलेले नाही. उभय संघ या सर्वोच्च स्पर्धेत पाच वेळा आमने सामने आले आहेत. 2018 सालच्या विश्वचषक स्पर्धेत याच इंग्लंडने इंडियाला उपांत्य लढतीत हरवले होते. उभय संघांत आतापर्यंत 19 टी-20 सामने झाले असून त्यातील 15 इंग्लंडने, तर टीम इंडियाने 4 लढती जिंकल्या आहेत. मात्र यावेळेस पावसाने टीम इंडिया व इंग्लंडमधील सामन्यात व्यत्यय आणला व त्याचा फायदा टीम इंडियाला झाला.

रविवारी टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया आमने सामने..
दोन्ही सेमीफायनल लढती पावसामुळे रद्द कराव्या लागल्या तर इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत मेलबर्नच्या मैदानावर रविवारी फायनलचा सामना होईल. कारण ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघ सर्वोच्च स्थानावर राहिले आहेत. पहिला सामना रद्द झाल्यामुळे हिंदुस्थान पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विजयी झाला असून येत्या रविवारी टीम इंडिया व ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages