🔯 साप्ताहिक राशीभविष्य - रविवार दि. 22 मार्च 2020 ते शनिवार दि. 28 मार्च 2020.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, March 22, 2020

🔯 साप्ताहिक राशीभविष्य - रविवार दि. 22 मार्च 2020 ते शनिवार दि. 28 मार्च 2020..


🔯 साप्ताहिक राशीभविष्य - रविवार दि. 22 मार्च 2020 ते शनिवार दि. 28 मार्च 2020..

मेष - सावधपणे निर्णय घ्या !
मेषेच्या दशमेषात मंगळ, धनेश्यांत शुक्र राश्यांतर होत आहे. आत्मविश्वास, उत्साह वाढवणार आहे. छोटीशी चूक सुधारण्यासाठी प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. राजकीय, सामाजिक डावपेच दूरदृष्टिकोनातून तयार करा. आरोप येईल. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. वाटाघाटीत यश मिळेल.
शुभ दिनांक – 22, 28
वृषभ - बुद्धिचातुर्य वापरा.
वृषभेच्या भाग्येषात मंगळ, स्वराशीत शुक्र राश्यांतर होत आहे. कुणावरही विश्वास ठेवताना बुद्धिचातुर्य वापरा. व्यवसायात काम मिळेल. नोकरीत तुमच्या जबाबदारी येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारप्राप्तीची संधी मिळेल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एखादी योजना बनवा. संभ्रमात पडाल.
शुभ दिनांक – 24, 25
मिथून – जबाबदारीचे कार्य पार पाडा.
मिथुनेच्या अष्टमेषात मंगळ, व्ययेषात शुक्र राश्यांतर होत आहे. धंद्यातील महत्त्वाचे काम करून घ्या. कुटुंबातील जबाबदारीचे कार्य रेंगाळत ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यक्रम पूर्ण कराल. गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ समाचार मिळेल. चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत प्रगतीची संधी मिळेल.
शुभ दिनांक – 23, 25
कर्क – मान-प्रतिष्ठा वाढेल.
कर्केच्या सप्तमेषात मंगळ, एकादशात शुक्र राश्यांतर होत आहे. आक्रमक होताना चौफेर सावध राहा. व्यवसायात प्रगती होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांना रोखता येईल. कल्पनाशक्तीला प्रेरणा मिळेल.
शुभ दिनांक – 24, 25
सिंह – सावधपणे निर्णय घ्या !
सिंहेच्या षष्ठेषात मंगळ, दशमेषात शुक्र राश्यांतर होत आहे. राजकारणात अचानक शत्रू, मित्र यांची अदलाबदल होऊ शकते. सावधपणे निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार काम करा. कुठेही आक्रमक न होता बुद्धिचातुर्य वापरा. जमीन, घर यासंबंधी कामात अडचण येऊ शकते.
शुभ दिनांक – 22, 23
कन्या – उतावळेपणा नको.
कन्येच्या पंचमेषात मंगळ, भाग्येषात शुक्र राश्यांतर होत आहे. कोणतेही क्षेत्र असले तरी तुम्हाला उतावळेपणा करून उपयोग नाही. गैरसमज, वाद पटकन निर्माण होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगली बातमी मिळेल. नाटय़चित्रपट क्षेत्रांत संमिश्र घटना घडेल.
शुभ दिनांक – 24, 25
तूळ – अहंकाराला दूर ठेवा.
तुळेच्या सुखेषात मंगळ, अष्टमेषात शुक्र राश्यांतर होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करून घ्या. अहंकार नको. व्यवसायात वाढ होईल. नोकरीमध्ये कामाचा व्याप असेल. घरातील काम करताना नीट अंदाज घ्या. चूक टाळता येईल. नाटय़, चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत तुमच्या कौतुक होईल.
शुभ दिनांक – 22, 23
वृश्चिक – मनोधैर्य जपा.
वृश्चिकेच्या पराक्रमात मंगळ, सप्तमेषात शुक्र राश्यांतर होत आहे. कोणत्याही कठीण प्रश्नावर उत्तर शोधता येईल. विरोधकांचा पाठपुरावा करण्यात वेळ जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न होईल. घर, जमीनसंबंधी समस्येचा प्रश्न सोडवणे सोपे नाही.
शुभ दिनांक – 24, 25
धनु – नोकरीत वर्चस्व राहील.
धनुच्या धनेषात मंगळ, षष्ठेषात शुक्र राश्यांतर होत आहे. साडेसाती सुरू आहे. कोणत्याही कामाला रेंगाळत ठेवू नका. नोकरीत वर्चस्व राहील. गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय, सामाजिक क्षेत्रात विशेष कामगिरी पूर्ण करावी लागेल. कुटुंबातील कामे होतील. क्रीडा क्षेत्रांत पराक्रम गाजवाल.
शुभ दिनांक – 22, 23
मकर – कार्याला प्रेरणा मिळेल.
स्वराशीत मंगळ, मकरेच्या पंचमेषात शुक्र राश्यांतर होत आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला तुमच्या कार्याला प्रेरणा देणारा ठरेल. गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ राजकीय, सामाजिक क्षेत्रात करा. व्यवसायातील मोठी समस्या मिटवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक सुखात भर पडेल. एखादी चिंता कमी होईल.
शुभ दिनांक – 24, 25
कुंभ – परदेशगमनाची संधी.
कुंभेच्या व्ययेषात मंगळ, सुखेषात शुक्र राश्यांतर होत आहे. प्रत्येक दिवस महत्त्वपूर्ण ठरू शकतो. रेंगाळलेले काम करून घ्या. नोकरीत बदल शक्य होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण निर्णय घेता येईल. नाटय़, चित्रपट, क्रीडा जगतात नावलौकिकात भर पडेल.
शुभ दिनांक – 24, 25
मीन नव्या दिशेने प्रगती होईल.
मीनेच्या एकादशात मंगळ, पराक्रमात शुक्र राश्यांतर होत आहे. रविवार, सोमवार कोणत्याही वक्तव्याची घाई करू नका. तुमचे महत्त्व वाढतच जाणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या दिशेने प्रगती करता येईल. दौऱयात जनतेच्या समस्या समजावून घ्या. चांगली घटना घडेल.
शुभ दिनांक – 27, 28

Post Bottom Ad

#

Pages