📣 रविवार दि. 22 मार्च रोजी संपूर्ण भारतात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, March 19, 2020

📣 रविवार दि. 22 मार्च रोजी संपूर्ण भारतात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन..


📣 रविवार दि. 22 मार्च रोजी संपूर्ण भारतात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासीयांना आवाहन..

देश सध्या मोठ्या संकटातून जात आहे. संकट आलच तर ते एखाद्या देशासाठी येतं पण सध्या संपूर्ण जग धोक्यात आहे. कोरोनामुळे जगभरात वातावरण बिघटडलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, या महामारीचा सगळेच देश सामना करत आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सतर्क आणि सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. मी आतापर्यंत जे मागितलं त्यासाठी 130 कोटी देशवासियांनी मला कधीच नाराज केलं नाही त्यामुळे आताही मी सगळ्यांकडे काही मागण्यासाठी आलो आहे.

मला तुमचे काही आठवडे हवे आहेत आणि तुमचा वेळ हवा आहे. कोरोनावर निश्चित उपाय सापडलेला नाही. त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. पण यावर भारतीय शास्त्रज्ञ काम करत आहे असं नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत.

मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे ..
आपण निरोगी रााहिलो तर जग निरोगी राहिल.
कोरोनाचा सामना करण्यासाठी संयम ठेवणं महत्त्वाचं आहे.
गर्दीपासून साावध रहा, घराच्या बाहेर निघू नका.
जितकं शक्य आहे तितकं घरी राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तेवढी कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा.
सरकारी कर्मचारी, रुग्णालयं आणि पत्रकारांना काम करणं महत्त्वाचं आहे. पण इतरांनी स्वत:ला आयसोलेटेड करणं महत्त्वाचं आहे.
वयोवृद्धांनी पुढचे काही दिवस घराच्या बाहेर पाऊल टाकू नका.
22 मार्चला संचारबंदी लागू करण्यात येईल, त्याचं सगळेजण पालन करूया.
जनतेनं जनतेसाठी संचारबंदी करा.
सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडू नका.
जनता कर्फ्यूचा संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा.
ही कसोटी कोरोनाविरुद्ध चाचणी आहे.
रविवारी आपण आपल्या दरवाजासमोर उभं राहून संध्याकाळी 5 वाजता अशा लोकांचे आभार व्यक्त करा ज्यांनी आपल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली.
22 मार्चला सगळ्यांचे कृतज्ञतेने आभार माना.
रुटीन चेकअपसाठीसुद्धा घराच्या बाहेर पडू नका. शक्य असेल तर डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घ्या.
या महामारीमुळे देशातील सर्वसामान्यांवर आर्थिक अडचण आहे.
मोठ्या वर्गातील लोकांना निवदेन आहे की तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत करा.

यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूमुळे ओढावलेली परिस्थिती आणि या आजाराला सामोरं जाण्यासाठी सरकारने उचललेली पाऊलं यावर माहिती दिली आहे. तसंच आपण कोरोनाचा सामना कसा केला पाहिजे याबद्दलही मोदींनी नागरिकांना मार्गदर्श केलं आहे.

देशात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने महत्त्वाच्या काही सचूना जाहीर केल्या आहे. राज्यातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारनं कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

COVID19 संदर्भात नवीन सूचना जाहीर ..
22 मार्चपासून एक आठवडा कोणतेही नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान भारतात येण्यास परवानगी नाही.
राज्य सरकारने अधिसूचना काढून 65 वर्षांवरील व्यक्तींना घराबाहेर (वैद्यकीय कामाव्यतिरिक्त) पडू नये, असा सल्ला द्यावा.
त्याचप्रमाणे 10 वर्षाखालील मुलामुलींना घराबाहेर पडू देऊ नये.
रेल्वे आणि हवाई वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या प्रवासी सवलती रद्द कराव्या, (अपवाद: विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग)
राज्य सरकारांनी खासगी क्षेत्राला घरुन काम करण्याची मूभा द्यावी.
गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्याआड व वेगळ्या वेळांमध्ये कार्यालयात हजर राहण्याची सूचना.

दरम्यान, फक्त कोरोनाप्रभावित राज्यांतच नाही तर या सूचना देशभरासाठी लागू करण्याचा केंद्राचा निर्णय आहे.दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संपूर्ण लॉकडाउनचा निर्णय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

देशात कोरोनाव्हायरसमुळे चौथा मृत्यू ..
देशात कोरोनाव्हायरसमुळे चौथा मृत्यू नोंदला गेला आहे. पंजाबमध्ये दाखल असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा आज मृत्यू झाला आहे. देशात आत्तापर्यंत 167 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची नोंद आहे. यात दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?..
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा जनतेशी संवाद साधला. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Post Bottom Ad

#

Pages