🚳 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 23 ते 31 मार्च 2020 रोजी पर्यंत वाहतुकीस मनाईचे आदेश; मा.पोलीस सहआयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 23, 2020

🚳 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 23 ते 31 मार्च 2020 रोजी पर्यंत वाहतुकीस मनाईचे आदेश; मा.पोलीस सहआयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे..


🚳 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 23 ते 31 मार्च 2020 रोजी पर्यंत वाहतुकीस मनाईचे आदेश; मा.पोलीस सहआयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे..

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१) (३) प्रमाणे सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी दुपारी ०३.००
ते मंगळवार दि.३१ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० वाजण्याच्या दरम्यान वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश..

१) कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसुन येत आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर, यांचेकडील जा क्र १९९८/कोरोना/मनाई/आदेश/२०२० रविवार दि.२२ मार्च २०२० अन्वये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१) (३) प्रमाणे जमावबंदी आदेश अंमलात आहे.

२) कोरोना रोगाच्या परस्पर संपर्कामुळे या विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षितेतला संकट उत्पन्न होऊ शकते. त्या अनुषंगाने तातडीची प्रतिबंधक उपाययोजना करण्याकामी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ मधील तरतुदींच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या वाहतुकीस मनाई करण्यासाठी स्थानिक निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त पुण्यात प्रवेश करणारे यांना, उद्देशून आदेश काढण्यात आले आहे.

३) महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग-१ मध्य उप-विभाग यांचे कडील अधिसुचना क्रमांक ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चा क्र.एमएससी-१२७४/व्ही-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (II -1974) चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नियुक्त करुन कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केले आहेत.

४) मा.पोलीस सहाय्यक आयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून शासनाच्या दि.०१/०४/१९७४ चे अधिसुचनेव्दारे प्राधिकृत अधिकारी म्हणुन पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) अन्वये कोणत्याही व्यक्तीला पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी सायकल तसेच पारंपारिक व अपारंपारिक इंधनावर चालणा-या मोटार सायकल (गिअरसह/शिवाय), सर्व प्रकारच्या तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करणारा आदेश सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी दुपारी ०३.०० वाजता ते मंगळवार दि.३१ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० वाजण्याच्या दरम्यान लागू करीत आहेत.

५) या आदेशात खाजगी प्रवासी वाहने तसेच सर्व प्रकारच्या रिक्षा, टॅक्सी (अॅप आधारित ओला, उबेर व तत्सम वाहनांसह) या सर्वांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.

६) सदर आदेश खालीलबाबतीत लागु होणार नाहीत..
पोलीस व आरोग्य विभाग तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी संबंधित ( फक्त कर्तव्यार्थ)
तातडीचे रुग्णवाहतुक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ ( फक्त कर्तव्यार्थ)
अत्यावश्यक सेवा ( उदा. वीज, पाणी पुरवठा, दुरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबंधित उद्योग - CNI ) ( फक्त कर्तव्यार्थ व तातडीचे असल्यास)
जीवनावश्यक सेवा, वस्तू व माल यांची वाहतूक
प्रसारमाध्यम व त्यांचे प्रतिनिधी ( फक्त कर्तव्यार्थ )
माझ्यावतीने व जिल्हाधिकारी, पुणे यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती (यासाठी पुढील नमुद वॉटस्अप क्र. ८९७५९५३१०० अथवा ई-मेल ctrlroom.home-pune@gov.in,
homebranchpune@gmail.com यावर लेखी संपर्क साधावा.
)
टिप - १) सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी त्यांचे ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल.
२) राज्यातील महत्वाची शहरांना एकमेकांशी जोडणारे मार्ग, जे पुणे शहारातुन जातात, अशा मार्गावरील वाहतुकीतील बदलांबाबतचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित केले जातील.

७) उपरोक्त ठिकाणी सर्व संबंधितांना आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उप आयुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदरचा आदेश मा.पोलीसे सहाय्यक आयुक्त पुणे शहर श्री. डॉ . रवींद्र शिसवे यांनी सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी दिले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages