🚨 पुण्यात छोट्या राजनच्या पुतणीनं साथीदारांच्या मदतीनं 50 लाखांच्या खंडणीची मागणी; साथीदार अटकेत.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 14, 2020

🚨 पुण्यात छोट्या राजनच्या पुतणीनं साथीदारांच्या मदतीनं 50 लाखांच्या खंडणीची मागणी; साथीदार अटकेत..


🚨 पुण्यात छोट्या राजनच्या पुतणीनं साथीदारांच्या मदतीनं 50 लाखांच्या खंडणीची मागणी; साथीदार अटकेत..

कुख्यात गुंड छोट्या राजनच्या पुतणीनं तिच्या साथीदारांच्या मदतीनं पुण्यात 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादाचं प्रकरणी मिटवण्यासाठी पुतणीनं शहरातील एक तरुणाकडे ही खंडणी मागितली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे गुन्हे शाखेनं खंडणी घेताना एकाला पकडलं असून या तिघांविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेनं आपल्या दोन साथीदारांसह हा खंडणीचा कट रचला होता. त्यातील एक जण खंडणी घेण्यासाठी अरोरा टॉवर परिसरात आला होता. 25 लाखांची खंडणी घेताना त्याला पुणे गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आणि चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
एका तरुणानं खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून खंडणी प्रकरणातील एकाला अटक केली आहे. तक्रारदार तरुणाची पत्नी आणि मेहुणी यांचा अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी कुख्यात गुंड छोटा राजनच्या पुतणीनं आपल्या दोन साथीदारांसोबत संगनमत करून तक्रारदारविरोधात गुन्हा दाखल या तरुणाला बेड्या ठोकल्या. चौकशीअंती ही खंडणी छोटा राजनच्या पुतणीनं मागितली असल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. खंडणी विभागाचे अधिकारी आणि अप्पर पोलीस आयुक्तांनी खंडणी घेणाऱ्याला रंगेहात पकडलं आहे. या प्रककेला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांच्यात वाद सुरू झाला. हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रियदर्शनी निकाळजेनं 50 लाखांची खंडणी मागितली होती. एवढे पैसे नसल्यानं अर्धे पैसे देण्यासाठी फिर्यादार गेला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्यारणी कुख्यात गुंड छोट्या राजनच्या पुतणीसह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages