👌प्रवासी बोट उलटल्याच्या दुर्दैवी घटनेत कर्तव्यदक्ष पोलिसाने वाचवले 88 लोकांचे प्राण.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 14, 2020

👌प्रवासी बोट उलटल्याच्या दुर्दैवी घटनेत कर्तव्यदक्ष पोलिसाने वाचवले 88 लोकांचे प्राण..


👌 प्रवासी बोट उलटल्याच्या दुर्दैवी घटनेत कर्तव्यदक्ष पोलिसाने वाचवले 88 लोकांचे प्राण..

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मांडवा जेट्टी पासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असताना बोट उलटी झाली. यावेळी या बोटमधून 88 प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये प्रवासी पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

बोट उलटी झाल्यावर प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झाला. त्याचवेळी रायगड जिल्हा पोलीस दलाची सदगुरू कृपा बोट सागरी गस्तीवर निघाली होती. त्यातील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत हे त्याच्या मदतीला धावून गेले.

पोलिस प्रशांत घरत यांनी वाचवले 88 लोकांचे प्राण..
पोलिस प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांच्या मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कलंडलेल्या 88 प्रवाशांचा जीव वाचवला. या सगळ्यांना पोलीस गस्त नौकेच्या साहाय्याने मांडवा जेट्टीवर सुखरूप आणले आहे.

Post Bottom Ad

#

Pages