वाढत्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान पाहता सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ प्रकारातील वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, March 3, 2020

वाढत्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान पाहता सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ प्रकारातील वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश..

वाढत्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान पाहता सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ प्रकारातील वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश..

प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाबरोबरच माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान पाहता सर्वोच्च न्यायालयाने बीएस-४ प्रकारातील वाहनांची विक्री १ एप्रिल २०२० पासून बंद करण्याचे आदेश ऑक्टोबर २०१८ मध्ये दिले होते. या नव्या नियमांची अमंलबजावणी १ एप्रिल २०२० पासून केली जाणार आहे. त्यामुळे बीएस-४ प्राकारातील नवीन वाहने रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. प्रदूषणमुक्त आणि इंधन बचत करणाऱ्या बीएस-६ मानकांची पूर्तता न केल्यास नवीन वाहन नोंदणी करू नये, असे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे केवळ बीएस-६ प्रकारातील वाहनांच्याच विक्रीवर शिक्कामोर्तब केले होते. या निर्णयानंतर बीएस-६ प्रकारातील वाहने बनवण्यावर कंपन्यांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. नवीन मानकामुळे पेट्रोल आणि डिझेलचीही बचत होण्याबरोबरच ८५ टक्के प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

बीएस म्हणजे काय ?..
बीएस म्हणजे भारत स्टेज होय. या संकल्पनेचा संबंध थेट उत्सर्जन मानकांशी येतो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास बीएस-६ इंजिनयुक्त वाहनांमध्ये विशेष प्रकारच्या फिल्टरचा अंतर्भाव असणार आहे. या माध्यमातून ८० ते ९० टक्के पर्टिक्यूलेट मॅटर २.५ सारखे कण रोखले जातील. या माध्यमातून वातावरणात पसरणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या नायट्रोजन ऑक्साइडवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. अर्थात देशातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात बीएस-६ वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

नव्या निर्णयाची महाराष्ट्रातही अंमलबजावणी..
या नव्या निर्णयाची महाराष्ट्रातही अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने तीन दिवसांपूर्वीच आदेश जारी केले आहेत. १ एप्रिल २०२० पासून ‘बीएस-६’ मानकांची पूर्तता न करणाऱ्या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात येऊ नये, असे आदेश काढले आहेत. इंधनाची गुणवत्ता आणि वाहनामधून निघणाऱ्या धुरासाठी कायदे असून ते पाळणे वाहन कंपन्यांना बंधनकारक आहे. त्यामुळेच प्रदूषणमुक्तीसाठी वाहनांना बीएस-६ नवीन मानक अनिवार्य केले जात आहे. तसेच हा नियम न पाळल्यास वाहन नोंदी होणार नाही असे, परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी स्पष्ट केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages