📹 पोलीस नाईक अभिजित घाटे यांचा कोरोनावरील कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, March 21, 2020

📹 पोलीस नाईक अभिजित घाटे यांचा कोरोनावरील कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..

📹 पोलीस नाईक अभिजित घाटे यांचा कोरोनावरील कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल..

भारतासह जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. शंभरहून अधिक देशांमध्ये कोरोनानं शिरकाव केला आहे. भारतात 250 हून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात 63 जण कोरोनाबाधित असल्याची नुकतीच माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरं लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं उचलताना दिसत आहेत. तर उद्या देशभरात जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये जनतेनं सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीव सोशल मीडियावर अनेक मीम्स, जनजागृती करणारे मेसेजही तुफान व्हायरल होत आहेत. कोरोनावर गाणी आणि कविताही व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस नाईक अभिजित घाटे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी कोरोनावर चक्क कविता केली आहे. ही कविता मनातील जळमट दूर करून वास्तवाचं भान शिकवणारी आहे. तर वास्तव परिस्थिती दाखवून लोकांचे डोळे उघडण्यासाठी ही कविता नक्की ऐकायला हवी. ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कवितेला युझर्सनीही तुफान प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या या सर्जनशीलतेच पोलीस खात्यासह नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. सजग पोलीस म्हणून या नाईक पोलिसानं कवितेत जे मांडलंय त्या वास्तवाचा विचार केला तर काळजाला नक्की ही कविता भिडते.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता 63 वर पोहोचली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज 21 मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही 63 वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या 52 वर होती. त्यामुळे गेल्या 24 तासांत 11 नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे.

गेल्या 8 दिवसांमध्ये देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 89 वरुन 250 पर्यंत पोहोचली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयं, मंदिर, मज्जीत, गार्डन, जिमखाने बंद 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


Post Bottom Ad

#

Pages